आनंदाची बातमी! भारतीय नागरिकांना इंग्लंडला जाण्याची मिळाली परवानगी

युनायटेड किंगडमने आता प्रवासावरील निर्बंध आणखी शिथील करण्यात आली आहेत.
आनंदाची बातमी! भारतीय नागरिकांना इंग्लंडला जाण्याची मिळाली परवानगी
आनंदाची बातमी! भारतीय नागरिकांना इंग्लंडला जाण्याची मिळाली परवानगी Saam Tv
Published On

लंडन : युनायटेड किंगडमने United Kingdom आता प्रवासावरील निर्बंध Restrictions आणखी शिथील करण्यात आली आहेत. यामुळे भारतीयांचा Indians इंग्लंडला England जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. युकेने UK भारताला रेड लिस्ट मधून बाहेर काढले आहे. अंबर लिस्ट मध्ये समावेश केलेला आहे. येणाऱ्या ८ ऑगस्ट पासून या बदलची अमलबजावणी करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

युके सरकारच्या government वेबसाइटवर website जी माहिती उपलब्ध आहे. यानुसार, येत्या ८ ऑगस्टपासून पहाटे ४ वाजल्यापासून भारताचा अंबर लिस्टमध्ये समावेश करण्यात येणार आहे. भारताशिवाय बहरीन Bahrain, जॉर्जिया, मेक्सिको, यूएई आणि कतार या देशांचा देखील अंबर लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अंबर लिस्ट मध्ये ज्या देशांचा समावेश आहे, त्या देशामधील नागरिकांना इंग्लंड मध्ये येण्याअगोदर कोविड- १९ चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे.

आनंदाची बातमी! भारतीय नागरिकांना इंग्लंडला जाण्याची मिळाली परवानगी
भारतात लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम

इंग्लंडला येण्याच्या ३ दिवस आधी कोविड चाचणी करावी लागणार आहे. इंग्लंडमध्ये आल्यावर घरी किंवा अन्यत्र तुम्हाला १० दिवस विलगीकरणामध्ये रहावे लागणार आहे, असे यावेळी सांगितले आहे. इंग्लंडमध्ये कोविडच्या Covid २ लाटा येऊन गेले आहे. परंतु त्याठिकाणी लसीकरण हे मोठया प्रमाणावर झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा पुन्हा फैलाव होऊ नये, याकरिता युकेमध्ये जास्त खबरदारी घेतली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com