होर्मुझच्या सामुद्रधुनीवर तणाव वाढला; भारतीय खलाशी असलेल्या जहाजावर हल्ला

US Iran Conflict : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर तणाव वाढल्याचे दिसत आहे. या तणावादरम्यान भारतीय खलाशी असलेल्या जहाजावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
US Iran news
US Iran Conflict Saam tv
Published On
Summary

अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा संघर्ष पेटला

दोन्ही देश एकमेकांच्या विरोधात उभे

भारतीय खलाशी असलेल्या जहाजांवर हल्ला

अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. दोन्ही देश होर्मुझच्या सामुद्रधुनीवर एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर तणाव वाढला आहे. त्याचा परिणाम भारतावर होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी भारताच्या जहाजावर हल्ला झाला होता. त्यानंतर शनिवारी पुन्हा भारतीय खलाशी असलेल्या जहाजाला लक्ष्य करण्यात आलं आहे.

US Iran news
Pune : पुण्यात भयंकर घडलं! नामांकित कंपनीत गॅस गळती; गुदमरून २ जणांचा मृत्यू, ३ जखमी

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर जहाजांवर होणारे हल्ले सुरूच आहे. हाँगकाँगचा ध्वज असलेल्या जहाजावर १२-१३ जूनच्या रात्री हल्ला करण्यात आला. या जहाजावर सर्व भारतीय खलाशी होते. या हल्ल्यामुळे जहाजाचं नुकसान झालं, परंतु सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

एकीकडे अमेरिका नाकेबंदी तोडणाचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांवर हल्ला करत आहेत. तर दुसरीकडे इराण अमेरिकेला प्रत्युत्तर देताना दिसत आहे. या संघर्षाचा भारतीय खलाशांना फटका बसताना दिसत आहे.

US Iran news
पश्चिम आशियात पुन्हा संघर्ष पेटला; इराणने समुद्रातील ४ जहाजांवर मिसाइल डागल्या, अमेरिकेचं फायटर जेट पाडलं

जहाजावर ड्रोनने हल्ला

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून १२-१३ जूनच्या रात्री जाणाऱ्या तेलवाहू जहाजावर ड्रोनद्वारे हल्ला झाला. या जहाजावर सर्व कर्मचारी भारतीय होते. सुदैवाने सर्व भारतीय खलाशी सुखरूप आहेत. या जहाजाचे नाव 'बोचेम मारेन्गो' असे आहे. तेल आणि केमिकलचं टँकर असलेलं जहाज आहे. हे जहाज अँग्लो-ईस्टर्न शिप मॅनेजमेंट (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवले जात होते. ते जहाज अमेरिकेच्या NCAGS सुरक्षा प्रणालीअंतर्गत प्रवास करत होते. तसेच ते अमेरिकन नौदलाच्या निगराणीखाली होते. त्यानंतरही १२ आणि १३ जूनच्या रात्री एका ड्रोनच्या साहाय्याने जहाजाला लक्ष्य करण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com