Big Breaking: युक्रेनमधील बॉम्ब हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

आज सकाळी खार्किवमध्ये करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला
Big Breaking: युक्रेनमधील बॉम्ब हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
Big Breaking: युक्रेनमधील बॉम्ब हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू Saam Tv

वृत्तसंस्था: रशिया- युक्रेन क्रायसिस लाइव्ह: मंगळवारी सकाळी खार्किवमध्ये करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. असे एमईएचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यावेळी सांगितले आहे. नवीन शेखरप्पा (वय २१) असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो कर्नाटकचा रहिवासी आहे.आज सकाळी खार्किवमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची आम्ही माहिती देत आहोत. मंत्रालय त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. आम्ही कुटुंबाप्रती मनापासून शोक व्यक्त करत आहे,” असे त्यांनी ट्विट केले आहे.

हे देखील पहा-

रशियन रॉकेट हल्ल्यात ७० पेक्षा जास्त युक्रेनियन सैनिक ठार झाले आणि "बर्बर" हल्ल्यात अनेक नागरिक मरण पावले आहेत. युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार की, एक मोठा रशियन सैन्य काफिला राजधानी कीवजवळ आला. कीवमधील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या सल्लागारात भारतीयांना 'उपलब्ध कोणत्याही माध्यमाने' तातडीने कीव सोडण्यास सांगितले होते.

भारतीय (Indian) दूतावासाने आपल्या अॅडव्हायझरीमध्ये सांगितले आहे की, कीवमधील भारतीयांसाठी सल्ला.. विद्यार्थ्यांबरोबरच (students) सर्व भारतीय नागरिकांना आज तात्काळ कीव सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अगोदरच उपलब्ध असलेल्या गाड्यांद्वारे किंवा इतर कोणत्याही उपलब्ध मार्गाने त्वरित हा देश सोडायला सांगितला आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये रशिया खूपच आक्रमक होत आहे.

Big Breaking: युक्रेनमधील बॉम्ब हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
Russia Ukraine News Live: आजच कीव सोडा; भारतीयांना युक्रेन सोडण्याचा दिला सल्ला

युक्रेनची राजधानी (Capital) कीववर काल रात्रीपासून क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. धोका लक्षात घेऊन भारतीय दूतावासाने सर्व भारतीयाकरिता एक सूचना जारी केली आहे. अॅडव्हायझरीमध्ये सर्व भारतीयांना आज कीवमधून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. त्याला जे काही मिळणार आहे ते वापरून कीव सोडण्यास सांगितले आहे.

कीवमध्ये रशियन सैनिक सोमवारी रात्रीपासून सतत बॉम्ब (Bomb) आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहेत. कीव ताब्यात घेण्याकरिता रशिया चांगलाच आक्रमक झाला आहे. सततच्या हल्ल्यांमुळे धोका वाढला आहे. यामुळेच भारतीय दूतावासाने घाईघाईत अॅडव्हायझरी जारी केले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com