Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?

Instagram Reels : रेल्वे स्टेशनवर खतरनाक स्टंट करत रिल्स बनवले जातात. अशाप्रकारचे रिल्स बनवणाऱ्या तरुणांवर रेल्वेकडून कारवाई केली जाणार आहे. त्यांना १ हजारांचा दंड आणि अटक केली जाणार आहे.
Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?
Instagram Reels Shooting On Railway StationSaam Tv
Published On

Summary -

  • रेल्वे स्थानकावर रील्स बनवाल तर भरावा लागेल 1,000 रुपये दंड

  • रेल्वे स्थानकावर धोकादायक स्टंट केल्यास होईल अटक

  • CCTV आणि रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांचे लक्ष

सोशल मीडिया म्हटलं की रिल्स हे समिकरण आलंच. सध्या रिल्सचा जमाना आहे असे म्हटले जाते. इन्स्टाग्रामवर रिल्सची खूप क्रेझ वाढली आहे. अगदी काही क्षणात ही रिल्सच व्हायरल होऊन त्याला चांगले व्ह्यूज मिळतात. इन्स्टाग्रामवर तासंतास रिल्स बघत बसणे अनेकांना आवडते. फॉलोअर्स वाढवण्यासाठी तरुण-तरुणी वेगवेगळ्या ठिकाणी रिल्स बनवतात. रेल्वे स्टेशन, रेल्वे ट्रॅक आणि रेल्वेच्या कोचमध्ये धोकादायक पद्धतीने रिल्स बनवले जातात. जीवाची परवा न करत हे रिल्स बनवले जाते. पण यापुढे रेल्वे स्टेशनवर रिल्स बनवणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानके, रेल्वे ट्रॅक आणि रेल्वेच्या डब्यांमध्ये धोकादायक पद्धतीने रिल्स बनवणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. त्यांना १ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. जर रेल्वे स्टेशनवर, रेल्वेत किंवा परिसरात व्हिडिओ बनवताना पकडले गेले तर त्या व्यक्तींवर कारवाई केली जाणार आहे. तसंच, त्यांनी रेल्वेच्या डब्यातून उडी मारली किंवा धोकादायक पद्धतीने खाली उतरले ज्यामुळे प्रवाशांना धोका निर्माण झाला तर त्यांना अटक देखील केली जाईल. सर्वांना याचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला रेल्वेकडून देण्यात आला आहे.

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?
Social Media : तुम्ही सोशल मीडियाचा वापर जास्त करता का? यामुळे होऊ शकते नुकसान..

रिल्सची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः तरुणांमध्ये रिल्सची क्रेझ जास्त आहे. रुग्णालय, मंदिर, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, शॉपिंग मॉल आणि सिनेमा हॉल अशा ठिकाणी जिथे लोक जमतात तिथे ते त्यांचे फोन काढून रील्स बनवू लागतात. यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांना याचा खूप त्रास होतो. कधी कधी हे तरुण रिल्स तयार करताना जिवघेणा स्टंट देखील करतात. ते चालत्या ट्रेनमध्ये स्टंट करतानाचे रिल्स बनवतात. कधी रुळावर उभं राहून ट्रेन येण्यापूर्वी जवळून व्हिडिओ तयार करतात. तर कधी बिनधास्त रुळांवर चालतात. लाईक्स मिळवण्यासाठी रुळांवर झोपणे आणि चालत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उडी मारणे असे विविध स्टंट ते करतात. पण हे असं केल्यामुळे अनेक तरुणांचे मृत्यू देखील झाले आहेत.

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?
Viral Social Media News : इंस्टाग्रामवर दोन फॉलोअर्स कमी झाले, बायकोची नवऱ्या विरोधात थेट पोलिस ठाण्यात धाव|VIRAL VIDEO

काही महिन्यांपूर्वी चेन्नईजवळ रिल्सच्या नादात एका १५ वर्षीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला होता. अशा परिस्थितीत लोकांनी रेल्वे स्थानकांवर कडक निर्बंध घालण्याची मागणी केली होती. यानंतर, रेल्वे प्रशासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यापुढे रेल्वे स्टेशनवर रिल्स बनवून पोस्ट करणाऱ्यांना किमान १,००० रुपये दंड आकारला जाईल.

या संदर्भात बोलताना रेल्वे अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, रेल्वे स्थानकांवर सहसा व्हिडिओ रेकॉर्डिंगला परवानगी नसते. परंतु रील्सच्या क्रेझमुळे बरेच लोक व्हिडिओ रेकॉर्ड करून पोस्ट करत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर आणि ट्रॅकवर व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. रेल्वे पोलिस, सुरक्षा कर्मचारी आणि रेल्वे स्थानक व्यवस्थापक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे हे काम करत आहेत.

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?
Social Media Users : पालकांनो सावधान! तुमची मुलंही सोशल मीडिया वापरत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com