Ahmednagar News: रेल्वे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे हजारो प्रवाशांचे हाल! जेवण पाण्याविना तब्बल ८ तास पुणतांबा स्टेशनवर खोळंबा

Ahmednagar Train Update: प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे विभागाने कुठल्याही सुविधा उपलब्ध करून न दिल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.
Ahmednagar News:
Ahmednagar News: Saamtv
Published On

सचिन बनसोडे, प्रतिनिधी...

Ahmednagar Railway News: मनमाड-दौंड लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. याअंतर्गत बेलापूर ते पढेगाव दरम्यान टप्पा पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने आज २२ जुलैपर्यंत तीन दिवसय मेगा ब्लॉक घेतला होता. मात्र हा मेगा ब्लॉक करत असताना रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला.

पुण्याकडे जाणाऱ्या काही गाड्या पुणतांबा स्टेशनवर सात ते आठ थांबवल्यामुळे जवळपास दहा हजार प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे विभागाने कुठल्याही सुविधा उपलब्ध करून न दिल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.

Ahmednagar News:
Snake Viral Video: ढीगभर सापांचा एकमेकांत गुंता; सुटका करताना सर्पमित्राचा घेतला चावा, पाहा थरारक VIDEO

१० हजार प्रवाशांना फटका...

याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर ते पढेगावदरम्यान लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे सध्या काम सुरू आहे. त्यामुळे नागपूर - पुणे, नांदेड - पुणे यासह अनेक गाड्या पुणतांबा स्टेशनवर थांबवण्यात आल्या होत्या. पहाटे चार वाजल्यापासून सकाळी अकरा वाजेपर्यंत या गाड्या पुणतांबा स्टेशनवरच उभ्या होत्या. त्यामुळे जवळपास दहा हजार प्रवाशांना फटका बसला.

प्रशानसाचा भोंगळ कारभार...

रेल्वे विभागाकडून जेवण पाण्याची व्यवस्थाही करण्यात न आल्याने महिला आणि लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागला. अकरा वाजेनंतर एक एक करून गाड्या पुढे मार्गस्थ करण्यात आल्या.. मात्र सात आठ तास एकाच जागी खोळंबून राहावे लागल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Ahmednagar News:
Snake Viral Video: ढीगभर सापांचा एकमेकांत गुंता; सुटका करताना सर्पमित्राचा घेतला चावा, पाहा थरारक VIDEO

दरम्यान, हा मेगाब्लॉक आज रात्री ११ वाजेपर्यंत राहणार असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले. मात्र या मार्गावर धावणाऱ्या दौंड-निजामाबाद डेमू, पुणे-भुसावळ मेमू आणि निजामबाद-दौंड डेमू या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या असून लांब पल्ल्याच्या चार गाड्या नाशिकमार्गे वळवण्यात आल्या आहेत. तसेच इतर ६ गाड्यांचे देखील मार्ग बदलण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com