

Vande Bharat Train: वंदे भारत एक्सप्रेसवर पुन्हा एकदा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी ही घटना घडली आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमजवळील कांचरापलेम येथील हा प्रकार आहे. येत्या 19 जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार होता.
रेल्वे अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या मेंटेनन्सदरम्यान ही दगडफेक झाली. दगडफेकीमुळे खिडकीच्या काचा फुटल्याचंही त्यांनी सांगितलं. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (Indian Railway)
यापूर्वीही दगडफेकीच्या घटना
याआधी ३ जानेवारीला पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती. ट्रेन दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसीडेवा भागाजवळ ते न्यू जलपाईगुडीकडे जात होती. यादरम्यान रेल्वेच्या सी-3 (सी-3) आणि सी-6 (सी-6) डब्यांवर दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडल्या आहेत.
त्याच दिवशी मालदा शहरापासून 50 किमी अंतरावर असलेल्या कुमारगंज रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती. या घटनेत 22303 वंदे भारत एक्सप्रेसच्या सी-13 क्रमांकाच्या डब्याची काच फुटली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.