Flights Shutdown in US : अमेरिकेत काहीतरी भयंकर घडलंय? हजारो विमानं एकाचवेळी जमिनीवर!

अमेरिकेतील विमानसेवा पुर्णपणे ठप्प झाल्या आहेत. संगणक प्रणालीत बिघाड झाल्याने अमेरिकेतील संपूर्ण विमानसेवेवर परिणाम झाला आहे.
Flights Shutdown in US
Flights Shutdown in US Saam Tv
Published On

Flights Shutdown in US : अमेरिकेतील विमानसेवा पुर्णपणे ठप्प झाल्या आहेत. संगणक प्रणालीत बिघाड झाल्याने अमेरिकेतील संपूर्ण विमानसेवेवर परिणाम झाला आहे. विमानसेवा ठप्प झाल्यामुळे हजारो प्रवाशी विमानतळावर अडकले आहेत. संगणक प्रणालीत बिघाड झाल्यामुळे १ हजाराहून अधिक उड्डाणे उशिराने आहेत. Flights Shutdown in America)

Flights Shutdown in US
3 Soldiers Martyred : गस्तीवर असताना LOCजवळ लष्कराचे जवान खोल दरीत कोसळले; ३ शहीद

अमेरिकेच्या 'फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन'ने (FAA) दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत संगणक प्रणालीत बिघाड झाल्यमुळे विमानसेवेवर (Flight) परिणाम झाला आहे. यामुळे NOTAMS च्या अपडेटवर परिणाम झाला आहे. या कारणामुळे १ हजाराहून अधिक उड्डाणे उशिराने आहेत.

फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने ट्विट करत सांगितले की, 'FAA एअर मिशन प्रणाली कार्यान्वित करत आहे. तसेच प्रणालीचे प्रमाणीकरणही तपासत आहोत. त्याचबरोबर प्रणाली कार्यान्वित करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत'. (Latest News)

काय आहे नोटीस टू एअर मिशन सिस्टम?

यूएस फेडरल एव्हिशन अॅडमिनिस्ट्रेशन नोटीस टू एअर मिशन हे सिस्टम वैमानिक आणि इतर कर्मचाऱ्यांना धोक्यांबद्दल सतर्क करते. त्याचबरोबर विमानतळाच्या सुविधा सेवांच्या कोणत्याही बदलांबद्गल सतर्क करतो. (Latest Marathi News)

दरम्यान, अमेरिकेत (America) विमानसेवा ठप्प झाली आहे. अमेरिकेत १ हजाराहून अधिक विमान जमीनीवर आहेत. त्याचबरोबर हजारो विमान हे विमानतळावर (Airport) लँडिंगसाठी हवेतच फिरत आहेत. संगणक प्रणालीत बिघाड झाल्यामुळे १२०० हून अधिक विमानसेवेवर परिणाम झाला आहे. आतापर्यंत जवळपास ९३ उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. संगणक प्रणालीत बिघाड झाल्यामुळे अमेरिकेतून भारतात परतणाऱ्या प्रवाशांचीही चिंतेत भर पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com