Railway Update : रेल्वेचा मोठा निर्णय! प्रवासात ठराविक वेळेत फोन चार्जिंग करता येणार नाही; वाचा सविस्तर

Indian Railway Update News : रेल्वे प्रवासात रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत चार्जिंग पॉइंटचा वीजपुरवठा बंद ठेवण्याचे निर्देश. काय आहेत रेल्वेचे नियम, जाणून घ्या.
INDIAN RAILWAYS NIGHT CHARGING RULES
INDIAN RAILWAYS NIGHT CHARGING RULESAI Image
Published On: 
Summary
  • रेल्वेचा मोठा निर्णय!

  • प्रवासात रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत चार्जिंग पॉइंट राहणार बंद

  • मुंबई-हावडा मेलमधील पॉवर बँक स्फोटानंतर रेल्वेचे कडक निर्देश

रेल्वेतून प्रवास करताना वेळ घालवण्यासाठी प्रवासी मोबाईलवर वेळ घालवतात. विरंगुळा म्हणून गाणी ऐकणे, रील बघणे किंवा फोनवर इतर कामे करतात. यादरम्यान मोबाईलची बॅटरी संपते आणि फोन बंद पडतो आणि त्याला चार्जिंगसाठी ठेवावा लागतो. मात्र तुम्हाला माहितेय का आता तुम्ही रेल्वेतून प्रवास करताना रात्रीच्या वेळेस फोन चार्ज करू शकणार नाही. कारण रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत रेल्वेकडून चार्जिंग पॉइंटसाठी वीजपुरवठा केला जाणार नाही असे निर्देश रेल्वेकडून जारी करण्यात आले आहे. ओडिशामध्ये मुंबई-हावडा मेलमध्ये पॉवर बँकचा स्फोट झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

नेमकी घटना काय घडली?

२५ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ३ वाजून ३८ मिनिटांनी ट्रेन क्रमांक १२८०९ मुंबई-हावडा मेलमध्ये ही घटना घडली. ओडिशातील बंडामुंडा परिसरातून ट्रेन जात असताना बी-३ एसी डब्यातील बर्थ क्रमांक ६ जवळ चार्जिंगला लावलेली एका प्रवाशाची पॉवर बँक अचानक फुटली. त्यामुळे डब्यात धूर पसरला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ परिस्थिती हाताळली. या घटनेनंतर ट्रेन सुमारे १५ मिनिटे थांबवण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

INDIAN RAILWAYS NIGHT CHARGING RULES
Morning Headache : सकळी उठल्या उठल्या डोकं दुखतं? असू शकतं 'या' भयंकर आजाराचं संकेत

रेल्वे बोर्डाचे नेमके निर्देश काय?

रेल्वे बोर्डाने अधिकाऱ्यांना पत्र पाठवून रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत चार्जिंग पॉइंटचा वीजपुरवठा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या नियमात कोणतीही सूट देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हा नियम नवीन नाही. रेल्वे बोर्डाने यापूर्वी १९ जून २०१४ रोजीही यासंदर्भात निर्देश दिले होते. आता या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना अचानक तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे.

INDIAN RAILWAYS NIGHT CHARGING RULES
Weather Update : ‘अर्णब’ चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकलं! महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

प्रवाशांनी कोणती काळजी घ्यावी?

रात्रीच्या प्रवासात मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची गरज भासणार असल्यास प्रवाशांनी रात्री ११ वाजण्यापूर्वीच ती चार्ज करून घ्यावीत. तसेच पॉवर बँक चार्जिंगला लावून झोपू नये आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी. महत्त्वाचे म्हणजे, रेल्वेतील चार्जिंग पॉइंट बंद ठेवण्याचा नियम म्हणजे मोबाईल किंवा पॉवर बँक ट्रेनमध्ये नेण्यावर बंदी नाही. रात्री प्रवाशांच्या झोपेच्या वेळी इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे आग किंवा इतर दुर्घटना घडू नयेत यासाठी हा या नियमामागील मुख्य उद्देश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com