
हरियाणाच्या पंचकुलामध्ये मोरनीजवळील बालदवाला गावात फायटर जेट कोसळल्याची घटना घडली आहे. फायटर जेटच्या अपघातामुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली. फायटर जेटच्या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. फायटर जेट क्रॅश झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फायटर जेट क्रॅश झाल्यानंतर तपासासाी विशेष पथक घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.
फायटर जेट क्रॅश झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. विमान कोसळल्यानंतर तुकडे जमिनीवर पसरले. भारतीय हवाई दलाच्या माहितीनुसार, जॅगुअर फायटर जेट विमान नियमित प्रशिक्षणादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे कोसळलं. जेट क्रॅश झाल्यानंतर पायटलला सुरक्षितरित्या बाहेर बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे पायलटचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.
हवाई दलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर म्हटलं आहे की, 'भारतीय हवाई दलाचं विमान तांत्रिक कारणामुळे कोसळलं'. विमान का कोसळलं, याची तपास करण्याचे आदेश हवाई दलाने दिले आहेत.
हवाई दलाकडून संपूर्ण घटनेची चौकशी सुरु केली आहे. भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी तपासाचे आदेश दिले आहेत. लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असा सल्ला लोकांना देण्यात आला आहे. जेट क्रॅश कोसळल्यानंतर तपासाच्या रिपोर्टकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हवाई दलाच्या माहितीनुसार, पायलटने सतर्कता दाखवत विमान लोकवस्तीपासून दूर नेलं. यामुळे विमान क्रॅश झाल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. एका व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विमान कोसळल्यानंतर आगीने पेट धरला. घटनेची माहिती मिळताच काही जण घटनास्थळी पोहचल्याचे दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.