
भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठी ऐतिहासिक वाढ झाली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेने पहिल्यांदा ४ ट्रिलियनचा टप्पा ओलांडला आहे. अर्थव्यवस्थेने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडल्याने भारत जगातील चौथ्या अर्थव्यवस्थेजवळ पोहोचला आहे. यामुळे भारताने ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या दिशेकडे एक मोठं पाऊल टाकलं आहे. (Latest Marathi News)
मीडिया वृत्तानुसार, आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपीत ७.८ टक्क्यांनी वाढ झाली. भारताच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा विश्वास व्यक्त केला आहे.
शक्तिकांत दास यांनी ३१ ऑक्टोबर रोजी भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठं भाकीत व्यक्त केलं होतं. 'मला खात्री आहे की नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या तिमाहीदरम्यान जीडीपीचे आश्चर्यचकीत करणारे आकडे येतील, असं वक्तव्य गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलं होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भारताने १८ नोव्हेंर रोजी रात्री उशिरा जीडीपीने शिखर गाठलं. भारताच्या जीडीपीने पहिल्यांदा ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. भारत देश जगात अर्थव्यवस्थेत चौथ्या क्रमाकांवर असणाऱ्या जर्मनीजवळ जाऊन पोहोचला आहे.
भारताचा जगात अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर आहे. अमेरिका अर्थव्यवस्थेत पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था ही २६.७ ट्रिलियन डॉलर्स आहे. तर चीन अर्थव्यवस्थेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनची अर्थव्यवस्था १९.२४ ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे.
तर तिसऱ्या क्रमांकावर जपान आहे. त्यांची अर्थव्यवस्था ४.३९ ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे. तर चौथ्या क्रमांकावर जर्मनी असून त्यांची अर्थव्यवस्था ४.२८ ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे.
केंद्र सरकारचं २०२५ सालापर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचा ध्येय आहे. 'भारत देश २०३०पर्यंत जपानला मागे टाकून जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल. त्याचबरोबर आशियातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, एस अँड पी ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंगने म्हटलं होतं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.