Army Cheetah Helicopter Crash: मोठी बातमी! लडाखमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश; डोंगराला धडकलं चीता हेलिकॉप्टर

Army Helicopter Accident in Ladakh : लडाखमध्ये भारतीय लष्कराचे चीता हेलिकॉप्टर डोंगरावर धडकल्याची घटना घडली आहे. हेलिकॉप्टरमध्ये एक मेजर जनरल आणि दोन वैमानिक होते.
Army Helicopter Accident in Ladakh
An Indian Army Cheetah helicopter crashed in Ladakh after reportedly hitting a mountain near the Shyok riversaam tv
Published On
Summary

लडाखमध्ये भारतीय लष्कराचे चीता हेलिकॉप्टर क्रॅश.

हेलिकॉप्टर श्योक नदीजवळच्या डोंगराला धडकलं.

मेजर जनरल सुरक्षित, दोन वैमानिक जखमी.

लडाखमधील एका डोंगरला भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर धडकल्यानंतर खाली कोसळले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे हेलिकॉप्टर श्योक नदीजवळच्या एका डोंगराला धडकलं . सुदैवाची गोष्ट म्हणजे हेलिकॉप्टरमधील लष्कराचे डिव्हिजन कमांडर (मेजर जनरल दर्जाचे अधिकारी) सुरक्षित आहेत. पण दोन्ही वैमानिक जखमी झालेत.

Army Helicopter Accident in Ladakh
Air India Flight: एअर इंडियाच्या विमानाचा अपघात; लँडिंग करताना फ्लाइटचा मागील भाग धावपट्टीला धडकला

हा अपघात २० मे रोजी दिवसा घडला होता, घटनेची माहिती मिळताच, लष्कराने तात्काळ कारवाई करत १५ ते २० मिनिटांच्या आत घटनास्थळी आपत्कालीन मदत आणि बचाव पथके पाठवली. तीन लष्करी अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढत रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर लेह येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Army Helicopter Accident in Ladakh
Hamza Burhan Killed: पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार; PoK मध्ये गोळीबारात केला खात्मा

लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी लडाखमधील हवामान पूर्णपणे स्वच्छ होते. कमी दृश्यमानता किंवा खराब हवामानासारख्या कोणत्याही समस्या नव्हत्या. त्यामुळे हेलिकॉप्टर डोंगराला कसे धडकले? असा सवाल उपस्थित होतोय, याबद्दल तर्कवितर्क काढले जात आहेत. अपघाताचे खरे कारण निश्चित करण्यासाठी लष्कराने अधिकृतपणे चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.

लष्काराचं चीता हेलिकॉप्टर पुन्हा चर्चेत

दरम्यान लष्कराचा जुना 'चीता' ताफा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या अपघातामुळे लष्कराच्या जुन्या हेलिकॉप्टर ताफ्याबद्दल पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जातेय. चीता हे एक-इंजिन असलेले हेलिकॉप्टर आहे, जे भारतीय लष्कराकडून बऱ्याच काळापासून दुर्गम आणि उंच भागांमध्ये वापरले जात आहे.

आकडेवारीनुसार, लष्करी हवाई दलाकडे सध्या अंदाजे १९० चीता, चेतक आणि चीतल हेलिकॉप्टर आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, यापैकी पाच हेलिकॉप्टर ५० वर्षांपेक्षा जुनी आहेत, तर अंदाजे १३० हेलिकॉप्टर ३० ते ५० वर्षे वयोगटातील आहेत. यामुळे संरक्षण तज्ज्ञ बऱ्याच काळापासून ही हेलिकॉप्टर बदलण्याची मागणी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com