Indian Air Force Day
Indian Air Force DaySaam Tv

Indian Air Force Day: हवाई दलानं ७२ वर्षानंतर बदलला झेंडा; नव्या ध्वजामध्ये काय केलेत बदल?

Air Force New Flag: नौदलानंतर आता वायुसेनेलाही नवा ध्वज मिळाला आहे.

Indian Air Force Day Air force Flag:

भारतीय वायुसेनेने आज आपला ९१ वा स्थापना दिवस (IAF ९१ वा वर्धापन दिन) साजरा केला. आज भारतीय हवाई दलानं ७२ वर्षानंतर आपल्या ध्वज बदलला आहे. प्रयागराजच्या बमरौली येथील वायुसेनेच्या मुख्य कार्यालयात याचं अनावरण करण्यात आले. भारतात ब्रिटीश राजवट असताना ८ ऑक्टोबर १९३२ रोजी हवाई दल रॉयल इंडियन एअर फोर्सची स्थापना करण्यात आली होती.(Latest News)

या दिवशी हे वायुसेना भव्य परेड करते. वायुसेनेतील जवानांचा सन्मान करण्यात येतो. तसेच देशभरात एअर शो आयोजित करत असतात. दरम्यान हवाई दलाची स्थापना झाल्याच्या ७२ वर्षांनंतर हवाई दलाने आपला ध्वज बदलला. दरम्यान या दलाला आधी रॉयल फोर्स म्हणून ओळखले जात होते. यानंतर त्याचे नाव रॉयल इंडियन एअर फोर्स ठेवण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर १९५० मध्ये रॉयल हा शब्द काढून इंडियन एअर फोर्स हे नाव देण्यात आले आणि ध्वजही बदलण्यात आला.

प्रयागराज येथे वायुसेनेच्या ९१ व्या स्थापना दिनी हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्या हस्ते नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले. प्रयागराज येथील सेंट्रल एअर कमांड हेडक्वार्टर बमरौली येथे आयोजित हवाई दलाच्या परेडनंतर हवाई दलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS)जनरल अनिल चौहान यांच्या उपस्थितीत हवाई दलाच्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले. नवीन भारतीय वायुसेनेने नवीन ध्वजमध्ये मूल्ये अधिक चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित केली आहेत.

काय आहेत बदल

आज नव्या ध्वजाला चार वायु सेनेच्या जवानांनी मंचावर आणलं. यानंतर वायुसेनेच्या प्रमुखांनी ध्वजाचं अनावरण केलं. वायुसेनेचा सध्याचा ध्वज निळा आहे. यात पहिल्या चतुर्थांश भागामध्ये राष्ट्रध्वज आहे . याच्या मध्यभागी राष्ट्रध्वजाच्या रंगांनी बनवलेले एक गोलाकार वर्तुळ आहे. दरम्यान हे चिन्ह १९५१ मध्ये स्वीकारण्यात आले होते. वायूसेनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वायू सेनेच्या मूल्यांचे अधिक चांगले प्रतिबिंबित करण्यासाठी एक नवीन ध्वज तयार करण्यात आलाय. ध्वजाच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात बदल केले आहेत.

उड्डाणाच्या बाजूला वायुसेना क्रेस्टचा समावेश केला आहे. सध्याच्या ध्वजावर अशोक स्तंभावरील सिंह आहे. त्याच्या खाली देवनागरीत 'सत्यमेव जयते' लिहिलंय. ऐतिहासिक अशोक स्तंभ हा भारताचा राजचिन्ह देखील. त्याखाली पंख पसरलेले हिमालयीन गरुड आहे. जे भारतीय वायुसेनेच्या लढाऊ गुणांचे प्रतीक आहे. हिमालयन गरुडाभोवती एक हलके निळे वर्तुळ आहे. यात भारतीय वायुसेना'. संस्कृतमध्ये भारतीय वायुसेनेचे ब्रीदवाक्य आहे. ''नभ स्पृशम दीपतम''. याचा अर्थ विजयासह गगनाला स्पर्श केला असा होतो. हे वाक्य हे श्रीमद्भगवद्गीता अध्याय ११ श्लोक २४ मधून घेतले आहेत. ‘तुम्ही उज्ज्वल आहात तुम्ही स्वर्गाला स्पर्श कराल’ किंवा दुसऱ्या शब्दांत ‘आकाशाला गौरवाने स्पर्श करा’, असा अर्थ या वाक्याचा होतो.

Indian Air Force Day
Indian Air Force Day 2023 :'भारतीय वायुसेना दिन' 8 ऑक्टोबरला का साजरा करतात? वाचा इतिहास आणि महत्त्व

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com