India Sri Lanka Dispute : भरसमुद्रात गोळीबाराचा थरार; श्रीलंकेच्या नौदलाकडून भारतीय मच्छिमारांवर गोळीबार

India Sri Lanka Dispute update : भरसमुद्रात गोळीबाराचा थरार झाल्याची घटना घडली आहे. श्रीलंकेच्या नौदलाकडून भारतीय मच्छिमारांवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर सर्व परिसरात खळबळ उडाली.
India Sri Lanka Dispute News
India Sri Lanka Dispute yandex
Published On

नवी दिल्ली : श्रीलंकेच्या नौदलाने मंगळवारी सकाळी डेल्फ्ट द्विपजवळ भारतीय मच्छिमारांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबारात ५ भारतीय मच्छिमार जखमी झाले. या गोळीबारात जखमी झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. तर तीन मच्छिमारांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेचा भारतीय परराष्ट्रीय मंत्रालयाने तीव्र शब्दात निषेध केला.

भारतातील कराईकल बंदरावरून मंगळवारी पहाटे डेल्प्ट द्विपजवळ मासेमारी करण्यासाठी १३ भारतीय मच्छिमार निघाले होते. या मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने सागरी सीमा ओलांडल्याचा आरोप करत अटक केली. त्याचवेळी श्रीलंकेच्या नौदलाने गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे.

India Sri Lanka Dispute News
Beed Politics : कराडला धक्का, मुंडेंची सावध भूमिका? वाल्मिकच्या खुर्चीवर मुंडेंनी भावाला बसवलं? VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, मच्छिमार हे परुथी थुराईजवळ मासे पकडत होते. त्यावेळी श्रीलंकेच्या नौदलाने त्यांच्या बोटीला घेरलं. श्रीलंकेच्या नौदलाने सागरी सीमा ओलांडणारी बोट आणि १३ मच्छिमारांना अटक केली. मच्छिमारांनी तामिळनाडूच्या दिशेने जायचा प्रयत्न केल्याने श्रीलंकेच्या नौदलाने गोळीबार केला. या गोळीबारात मच्छिमाराच्या पायाला गोळी लागली. तर दुसरा मच्छिमार देखील जमखी झाला. या मच्छिमारांना कांगेसंतुरई पोलिसांना सोपवण्यात आलं.

India Sri Lanka Dispute News
Pune Crime: गाडी नीट चालवा म्हटल्याने तरुणांची सटकली, मारहाण करत व्यावसायिकावर धारधार शस्त्राने वार

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, 'मच्छिमारांच्या १३ जणांपैकी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आता जवळील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत'. एमईएमध्ये बोटीतील तीन मच्छिमार किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भारतीय दुतावासाच्या अधिकाऱ्यांनी जखमी मच्छिमारांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी मदतीचे आश्वासन दिले होते.

India Sri Lanka Dispute News
Chembur Fire News : चेंबूरच्या एका इमारतीला भीषण आग, रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण; पाहा VIDEO

दरम्यान, काही दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या ४१ भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली होती. त्यांची सुटका केल्यानंतर त्यांना चेन्नईत आणलं होतं. त्यातील ३५ मच्छिमार हे तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील होते. त्यांना सागरी सीमा ओलांडल्याच्या आरोपाप्रकरणी अटक केली होती. याआधी देखील जानेवारी २०२५ महिन्यात १५ भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com