
भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
Beed Politics : वाल्मिक कराड हा सरपंच हत्येशी संबंधित खंडणीच्या आरोपात जेलमध्ये आहे. मात्र म्हणतात ना, घर फिरलं की घराचे वासे फिरतात तसंच काहीसं या वाल्मिकच्या बाबतीत झालंय. कारण वाल्मिकने ज्या जगमित्र ऑफिसमधून आपलं साम्राज्य उभं केल त्याच साम्राज्याला आता हादरे बसायला सुरुवात झालीय. वाल्मिक ज्या ऑफिसमधून सगळी सुत्रं हलवत होता, त्यालाच धनंजय मुंडेंनी धक्का दिलाय. धनंजय मुंडेंनी वाल्मिकची तिजोरी जगमित्र ऑफिस आपला चुलत भाऊ अजय मुंडेंच्या हाती दिलीय. मात्र हे अजय मुंडे कोण आहेत? पाहूयात.
कोण आहे अजय मुंडे?
- अजय मुंडे हे धनंजय मुंडेंचे चुलत भाऊ
- बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे गटनेते म्हणून काम
- धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत मतदारसंघात सक्रीय
- जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वाल्मिकच्या जगमित्र कार्यालयात मुंडे उपस्थित
मकोकांतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चाललीय. त्यातच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे व्यावसायिक भागीदार असल्याचा दावा अंजली दमानियांनी केलाय.
दमानियांचे मुंडेंवर खळबळजनक आरोप
- जगमित्र शुगर्सची 88 एकर 34 गुंठे जमिनीत कराड - मुंडे पार्टनर
- जगमित्र शुगर मिलमध्ये राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड संचालक
- व्यंकटेश इंडस्ट्रियल सर्व्हिसेसमध्ये राजश्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकत्र
- 2022 मध्ये कंपनीचा नफा 12 कोटी 27 लाख
- कंपनीने 2022 मध्ये अखेरची बॅलन्सशीट भरली
- इंडिया सिमेंट कंपनीची फ्लाय अॅश च्या वाहतूकीतही कंपनीचा सहभागa
- कराड-मुंडे यांच्यात जमीन एकत्र, कंपनी एकत्र, फ्लाय अॅश वाहतूक एकत्र असल्याचा दावा
कराड हा मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. दिवसेंदिवस वाल्मिक कराडचा पाय खोलात जात आहे. त्यामुळे वाल्मिकला दूर करून धनंजय मुंडेंनी अजय मुंडेंकडे जगमित्र कार्यालयाची सुत्रं सोपवल्याची चर्चा रंगलीय. मात्र वाल्मिकच्या कारनाम्यांमुळे मुंडेंनी खांदेपालट केलीय की सावधगिरीचा उपाय म्हणून हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.