

भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण
राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला कडक इशारा
ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्यामुळे वाद वाढला
पश्चिम आशियामध्ये युद्ध पेटले असतानाच भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या वक्तव्यांना प्रत्युत्तर देताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे. "जर त्यांनी बंगालकडे नजर टाकली तर पाकिस्तानचे किती तुकडे होतील हे फक्त देवच जाणे, असं विधान राजनाथ सिंह यांनी केले आहे. सिंह यांनी पाकिस्तानच्या विभाजनाचा ऐतिहासिक संदर्भ देत इस्लामाबादला तणाव वाढवणारी वक्तव्ये टाळण्याचा सल्ला दिला आहे.
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी असे भडकाऊ वक्तव्य करायला नको होते. 55 वर्षांपूर्वी त्यांनी त्याचे परिणाम भोगले, जेव्हा पाकिस्तान दोन भागांत विभागला गेला होता, जर त्यांनी बंगालवर नजर टाकण्याचा प्रयत्न केला, तर यावेळी पाकिस्तानचे किती तुकडे होतील हे फक्त देवालाच माहिती, असे राजनाथ सिंह म्हणालेत. पाकिस्तानच्या मंत्र्याने भारताला दिलेल्या धमकीला प्रत्युत्तर देण्याचे धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये नाही, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
त्यानंतर संरक्षणमंत्री सिंग यांनी हा इशारा दिला आहे. “भविष्यात भारताने काही कारवाई केली तर कोलकात्यात हल्ला करून प्रत्युत्तर दिले जाईल, असं पाकिस्तानचे संरक्षणमंत्री आसिफ म्हणाले होते. त्यावरून बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री कोलकाताला लक्ष्य करणार असल्याचे सांगत असताना पंतप्रधान मोदी गप्प का आहेत?
निवडणुकीपूर्वी पहलगामसारख्या हल्ल्याचा आराखडा तयार आहे का? बंगालला लक्ष्य करण्यावरून तुम्ही गप्प का राहिलात? पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांना प्रत्युत्तर देण्याची तुमच्यात हिंमत नाही का? जर बंगालच्या लोकांना लक्ष्य केले गेले, तर बंगाल दिल्लीला लक्ष्य करेल, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी मोदींवर टीका केली होती.
भारताकडून भविष्यात कोणतीही कारवाई झाल्यास पाकिस्तान ठोस प्रत्युत्तर देईल. जर भारताने यावेळी कोणतेही फॉल्स फ्लॅग ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला तर अल्लाहच्या कृपेने आम्ही ते कोलकात्यापर्यंत नेऊ, असे म्हटलं होतं. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काही लोकांचा वापर करून भारत फॉल्स फ्लॅग ऑपरेशन करू शकतो. त्या लोकांचे मृतदेह दहशतवाद्यांप्रमाणे दाखवले जाऊ शकतात. मात्र या आरोपांना त्यांनी कोणतेही ठोस पुरावे दिले नाहीत. पाकिस्तानकडून कोणत्याही हल्ल्याला त्वरित, संतुलित आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल, असे ही आसिफ म्हणाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.