रुग्णालयात उपचार घेणं आता महाग होणार? रुग्णालयातील खर्चात 70 टक्क्यांनी वाढ

Rising Medical Expenses: केंद्र सरकारच्या सर्वेक्षणातून एक धक्कादायक वास्तव समोर आलंय. आता खासगी रुग्णालयात उपचार घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या सर्वेक्षणात नेमकं काय म्हटलंय?
Rising hospital bills highlight the growing burden of healthcare costs on Indian families.
Rising hospital bills highlight the growing burden of healthcare costs on Indian families.saam tv
Published On

तुम्ही एकदम हेल्दी आणि फिट आहात .... आम्ही असं का विचारतोय... याचं कारण केंद्र सरकारच्या सर्वेक्षणातून समोर आलेल एक धक्कादायक वास्तव... या आरोग्य सर्वेक्षणानुसार जीवनशैली संबंधित आजारांत वेगाने वाढ होत असल्याचं समोर आलंय... यात तरूणांमध्ये संसर्गजन्य आजारांच प्रमाण 27 टक्के इतकं आहे. तर दुखापतींचं प्रमाण 17.9 टक्के दिसून आलंय. पचनसंस्थेशी संबंधित आजारांचं प्रमाण 14 टक्के इतके आहे. आणि त्याहूनही धक्कादायक म्हणजे, तुम्ही जर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झालात तर त्यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात तब्बल 70 टक्क्यांनी वाढ होणार आहे.

रुग्णालयीन उपचाराचा खर्च जो 2017-18 मध्ये 20,135 रुपये इतका होता तो 25-26 मध्ये 34,064 रुपयांपर्यंत गेला आहे. म्हणजेच वैद्यकीय खर्चात दरवर्षी अंदाजे 14 ते 15 टक्क्यांनी वाढ होत आहे.. त्यामुळेच उपचारादरम्यान औषधांचा खर्च, रक्त तपासणीचा खर्च बघता भविष्यात वैद्यकीय खर्च लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

खरंतर, 140 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील फक्त 1.4 लाख कुटुंबांच्या आरोग्याची स्थिती अशी असेल तर उर्वरित लोकसंख्येचं मग काय?. तरूणांमध्ये संसर्गजन्य आजारांच प्रमाण 27 टक्के इतकं आहे. त्यामुळे साहजिकच या वाढत्या टक्केवारीचा परिणाम तरुणाईच्या कार्यक्षमतेवर होणार आहे. अशावेळी आगामी काळात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करणं सरकारसमोरचं मोठं आव्हान असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com