India Hits Pakistan : भारताचा पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राइक, आर्थिक कोंडी होणार, व्यापार कायमचा बंद

India Pakistan trade ban : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सर्व व्यापार तात्काळ बंद केला आहे. यामुळे पाकिस्तानवर मोठा आर्थिक फटका बसणार असून, भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरही कठोर पावले उचलली आहेत.
Pahalgam Terror
Pahalgam Terror Attack NewsSaam tv
Published On

India Hits Pakistan With Major Economic Strike : भारताकडून पाकिस्तानला एकापाठोपाठ एक धक्के दिले जात आहेत. वॉटर स्ट्राइक, डिजिटल स्टाइकनंतर भारताने पाकिस्तानला आणखी एक धक्का दिलाय. भारताने पाकिस्तानमधून येणाऱ्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष वस्तूवर बंदी घातली आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा सर्व प्रकारचा व्यापार बंद करत मोठा धक्का दिला आहे. केंद्र सरकारकडून पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.त्याशिवाय भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरही खेळी केली आहे.

भारत सरकारने आज पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर तात्काळ बंदी घातली आहे. वाणिज्य मंत्रालयाकडून याबाबती अधिसूचना जारी केली आहे. पाकिस्तानातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी लागू करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्राक म्हटले आहे. पाकिस्तानसोबतची आयात-निर्यात पुढील आदेश येईपर्यंत बंद असेल. यापूर्वी थेट व्यापारावर बंदी घालण्यात आली होती, आता अप्रत्यक्ष आयातीवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Pahalgam Terror
Imran Khan : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांवर तुरूंगात बलात्कार, मेडिकल रिपोर्ट व्हायरल, नेमकं सत्य काय?

२२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये भ्याड हल्ला केला होता. या भ्याड हल्ल्यामध्ये २७ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे तपासात उघड झाल्यानंतर भारताने कारवाईचा बडगा उघारला आहे. भारताने वाघा-अटारी सीमेवरील व्यापारी मार्ग बंद करण्यात केला. त्यासोबतच १९६० चा सिंधू जलकरारही निलंबित केला. भारताने पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द केले. भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ भारत सोडण्याचे आदेश दिले होते. आता भारताने पाकिस्तानसोबतचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष व्यापार बंद केलाय. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला आर्थिक फटका बसणार आहे.

Pahalgam Terror
Ladki Bahin Yojana : लाडकीला पैसे देताना सरकारची दमछाक, दुसऱ्या खात्याचा निधी वळवला | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com