इंडिया आघाडीच्या नेत्यांनी डाव टाकला; निकालाआधीच सरकार स्थापन्यासाठी हालचाली सुरु
India Alliance Latest NewsSaamtv

lok Sabha Election 2024 : इंडिया आघाडीच्या नेत्यांनी डाव टाकला; निकालाआधीच सरकार स्थापन्यासाठी हालचाली सुरु

lok Sabha Election Update : लोकसभेच्या मतमोजणीदरम्यान इंडिया आघाडीने सरकार स्थापन्यासाठी हालचाली सुरु केले आहेत. एनडीएमधील घटक पक्षांशी काँग्रेस संवाद साधणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Published on

नवी दिल्ली : देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी सुरु झाली आहे. मतमोजणीचे कल समोर आले आहेत. देसभरात सर्व मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी २९५ जागांवर आघाडीवर आहे. तर २३० जांगावर इंडिया आघाडीवर आहे. लोकसभेचा निकाल जाहीर होण्याआधीच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सरकार स्थापन्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निकाल जाहीर होण्याआधीच इंडिया आघाडीने सरकार स्थापन्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून सरकार स्थापन्यासाठी डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीतील नेते एनडीएमधील घटक पक्षांसोबत संवाद साधणार आहे. तसेच आंध्र प्रदेशातील टीडीपी आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूसोबत संवाद साधणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी डाव टाकला; निकालाआधीच सरकार स्थापन्यासाठी हालचाली सुरु
Nitish Kumar: लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी नितीश कुमार यांनी घेतली PM मोदींची भेट, अमित शहा यांनाही भेटणार

इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून सरकार स्थापन करण्यासाठी काही खासदार कमी पडले तर त्यासाठी जुळवाजुळव करण्याची जबाबादारी शरद पवार यांच्या सारख्या बड्या नेत्यावर दिल्याची माहिती समोर समजत आहे. सरकार स्थापन करण्यासाठी ३० खासदार कमी पडले तर शरद पवार यांना बोलण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी डाव टाकला; निकालाआधीच सरकार स्थापन्यासाठी हालचाली सुरु
Prajwal Revanna News : सर्वात मोठी बातमी! कर्नाटकातून प्रज्ज्वल रेवन्ना यांचा दारुण पराभव

दरम्यान, केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी २७२ जागांचं बहुमत असणे गरजेचे असते. भाजपने यंदाच्या निवडणुकीत ४०० जागा पारचा नारा दिला होता. मात्र, देशभरातील मतदारसंघातील मतमोजणीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी ३०० जागांपेक्षा कमी जागांवर आघाडीवर आहे. याचदरम्यान, इंडिया आघाडीने सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com