Funny Viral Video : एकही रुपया खर्च न करता बनवला ट्रेडमिल; पाहून लोटपोट होऊन हसाल, आनंद महिंद्रा यांनी शेअर केला व्हिडिओ

एक जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video News
Viral Video News Saam Tv
Published On: 

Viral Video News : भारतातील लोक जुगाड करण्यात चांगलेच तरबेज असतात. भारतीयांचे अनोखे जुगाड जगभरात प्रसिद्ध आहेत. कमी पैशात वेगवेगळे जुगाड करताना भारतीय दिसतात. असाच एक जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील पठ्ठ्याने किचनमध्येच ट्रेडमिल तयार करून त्यात धावताना दिसत आहे. या पठ्ठ्याचा व्हिडिओ प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. (Latest Marathi News)

Viral Video News
Pathan Trailer: 'बेशरम रंग'च बदलला, पठानच्या ट्रेलरमध्ये दीपिका दिसते वेगळीच

किचनमध्ये बनवला ट्रेडमिल

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दिसत आहे. या व्हिडिओतील व्यक्तीने थेट ट्रे़डमिल बनवला. त्यासाठी त्याने जवळील फरशीवर डिशवॉशर टाकलं. त्यानंतर त्यावर थोडं पाणी टाकलं. त्यानंतर फरशीवरील डिशवॉशर सर्वत्र पसरवलं. (Viral Video)

त्यानंतर किचनचा आधार घेऊन चालू लागला. हा व्हिडिओ कुठलचा आहे, याची माहिती अद्याप समोर आली नाही. आनंद महिंद्रा यांनी जगातील सर्वात सस्त ट्रेडमिल असं कॅप्शन दिलं आहे. या युवकाला त्याच्या नाविण्यपूर्ण कृतीसाठी 'नाविन्यपूर्ण पुरस्कार' द्यायला हवा,असेही ते म्हणाले.

तीन तासात तीन लाख जणांनी पाहिला व्हिडिओ

सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताय आहे. लोकांनी या व्हिडिओला चांगलीच पंसती दर्शवली आहे. लोक या व्यक्तीच्या जुगाडचं कौतुक करत आहे.

सोशल मीडियावरील या व्हिडिओ तीन जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर एक हजार जणांनी व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरता येत नाहीये. एका युझरने म्हटले आहे की, 'हा व्हिडिओ नाविण्यपूर्ण आहे. पण ज्या महिलेला भांडे घासायचे आहे, तिचा विचार करा'. एकाने म्हटले आहे की, 'जुगाड करणे भारतीयांच्या रक्तात आहे'.

ट्रेडमिल करणे फायदेशीर

कार्डिओ व्यायाम करताना ट्रे़डमिल करणं चांगलं मानलं जातं. ट्रेडमिलवर धावताना लोक अनेक वस्तूंचा वापर करतात. पण ट्रेडमिलवर धावताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.