Hyderabad Tragedy: अग्नितांडव! फर्निचरच्या गोदामाला भीषण आग, 5 कामगारांचा होरपळून मृत्यू

Massive Fire at Furniture Godown: हैदराबादच्या नामपल्ली भागात एका फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली. त्यात पाच कामगारांचा मृत्यू झाला.पोलिसांनी गोदामालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Massive Fire at Furniture Godown:
Firefighters dousing flames after a massive blaze at a furniture warehouse in Hyderabad’s Nampally area.saa, tv
Published On
Summary
  • नामपल्लीतील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग

  • आगीत ५ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

  • मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश

हैदराबादमधील नामपल्ली येथील एका फर्निचरच्या गोदामाला शनिवारीच्या संध्याकाळी भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत ५ कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय. पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. गोदामाच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अग्निशमन विभागाचे महासंचालक विक्रम सिंह मान यांनी दिली.

नामपल्ली स्टेशन रोडवरील फर्निचरच्या गोदामामध्ये प्लायवूड, रेगझिम, फोम, केमिकल सोल्युशन यासह इतर गोष्टी असल्याने आगीने भडका घेतला. ही आग एवढी भीषण होती की आत अडकलेल्या कामगारांना बाहेरही पडता आलं नाही. फर्निचर दुकानाला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. लागलीच बचावकार्य सुरू केलं.

Massive Fire at Furniture Godown:
Accident : महामार्गावर अपघाताचा थरार, प्रवाशांनी भरलेल्या बसचा अपघात; तिघांचा मृत्यू

रात्रभर चाललेल्या मोहिमेदरम्यान एका व्यक्तीला सुखरूप वाचवण्यात आलं. मात्र पाच कामगारांचा यात मृत्यू झालाय. आम्हाला पाच जण गोदामात अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य सुरू केलं. सकाळी ९ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास पहिला मृतदेह सापडला. त्यानंतर एकामागोमाग पाचही मृतदेहही बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानीया रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाचे महासंचालक मान यांनी दिली.

Massive Fire at Furniture Godown:
तरुण गाढ झोपेत होता, दबक्या पावलाने नरभक्षक बिबट्या घरात शिरला, त्यानंतरचा थरार वाचून काळजाचा ठोका चुकेल

इमारतीच्या तळघरात त्यांच्या राहण्याची सोय करून देण्यात आली होती. तळघर फक्त वाहनांच्या पार्किंगसाठी होते. मात्र तिथे कामगारांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गोदामाला आग लागल्याने कामगारांनी तळघरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. धूर आणि आगीच्या भडक्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. एकमेकांना वाचवण्याच्या नादात पाच कामगारांचा मृत्यू झाला.

तळघरामध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ साठवून ठेवण्यात आलेले होते. त्यामुळे आग विझवण्यात आणि मृतदेह बाहेर काढण्यास बराच वेळ लागला. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग विझवली आणि मृतदेह बाहेर काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com