राज्यासह देशभरात बिबट्याने दहशत माजवली आहे. मंचर, अहिल्यानगरसह राज्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून यामध्ये आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. अक्षरशः बिबट्याने कित्येक लोकांना फाडून टाकले आहे. यामुळे काहीकाळ राज्याचे राजकारण देखील तापले होते. मंचरमध्ये महिला रात्री बाहेर देखील पडत नाहीये तर आपल्या मानेभोवती खिळयांचे आवरण घालून स्वतःच संरक्षण करत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे येथील मुलांचे लग्न देखील जमत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले होते.
अशातच ओडिसामध्ये एका तरुणाने बिबट्याचाच खात्मा केला आहे. ओडिसा राज्यातील कटक जिल्ह्यामध्ये नरसिंहपूरमध्ये शुक्रवारच्या मध्यरात्री एक खळबळ उडवून देणारी घटना घडली. या गावामध्ये बिबट्या आणि एका तरुणाची समोरासमोर चकमक झाली आणि चकमकीत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. तरुण देखील गंभीररित्या जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एक तरुण घरामध्ये गाढ झोपलेला होता. त्यावेळी अचानक बिबट्या घरात शिरला आणि त्या हल्लावर केला. अचानक झालेल्या हल्ल्याने घरात मोठी खळबळ उडाली. त्या तरुणाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मोठे धाडस केले आणि बिबट्यासोबत दोन हात करू लागला. दोघांमध्ये बराचवेळ जोरदार हल्ले प्रतिहल्ले सुरू होते. या दरम्यान तरुणाने त्याला ठार मारले. यामध्ये बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.
या हाणामारीत त्या तरुणाच्या शरीराच्या अनेक भागांना गंभीर दुखापत झाली. रक्ताने माखलेल्या या तरुणाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला रात्री कटकमधील एका मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. जखमी व्यक्तीचे नाव समर भोळ असे आहे. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. वन विभागाने मृत बिबट्याला ताब्यात घेतलं आहे आणि तपास सुरू केला आहे. बिबट्या गावात कुठून आला आणि घटनेच्या आजूबाजूच्या भागांचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेनंतर गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. गावकरी प्रचंड घाबरले असून घराबाहेर पडण्यास देखील ते घाबरत आहे. वन विभागाने जनतेला रात्री सतर्क राहण्याचे आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.