Cyclone Mandous : अस्मानी संकटे का येतात? चक्रीवादळाच्या धोक्याची तीव्रता कशी ओळखतात? जाणून घ्या सविस्तर एका क्लिकवर...

Cyclone Mandous Explainer: काय आहेत चक्रीवादळे निर्माण होण्याची कारणे? आणि त्यांच्या नामकरणाचा इतिहास जाणून घेऊया सविस्तर.
Cyclone Mandous
Cyclone Mandous Saam tv
Published On

Cyclone Mandous Explainer: हवामानातील बदलाने देशात अनेकदा मोठमोठी चक्रीवादळे निर्माण होत असतात. या उग्र आणि अस्मानी संकटाने मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी तसेच भौतिक हानीचा धोका उद्धभवत असतो. गतवर्षी तोक्ते, निसर्ग या चक्रीवादळांनी देशभरात थैमान घातले होते. आता पुन्हा एकदा अशाच अस्मानी संकटाने बंगालच्या उपसागरात धडक दिली आहे.

मंडस चक्रीवादळाच्या रुपाने सध्या पाँडेचरीमधील कराईकल आणि आंध्रप्रदेशमधील श्रीहरीकोटा भागात धोक्याचा इशारा दिला आहे. या भागातून मंडस चक्रीवादळ धडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील प्रशासनाने आधीपासूनच सतर्कता बाळगली आहे. मात्र ही चक्रीवादळे तयार कशी होतात? त्यांची नावे कशी ठरवली जातात? याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. काय आहेत चक्रीवादळे निर्माण होण्याची कारणे? आणि त्यांच्या नामकरणाचा इतिहास जाणून घेऊया सविस्तर. (Weather Latest News)

Cyclone Mandous
Shraddha Walker Case: धर्म जागृती झाली पाहीजे, १८ वर्षांनंतरच्या स्वातंत्र्यावर विचार व्हावा; श्रद्धाचे वडील काय म्हणाले?

चक्रीवादळे का आणि कशी तयार होतात?

चक्रीवादळे (Cyclone) ही समुद्रातील उष्ण पाण्याच्या वरती तयार होतात. समुद्रातील तापमान वाढल्याने त्यावरची हवा उष्ण व ओलसर असल्यामुळे वर येते. त्यामुळे त्या हवेच्या जागी पोकळी निर्माण होते आणि हवेचा दाब तळाच्या दिशेने कमी होतो. याच पोकळीला भरण्यासाठी आसपासची थंड हवा त्याठिकाणी व्यापते. त्यामुळे नवी हवा गरम आणि सौम्य होऊन वर येते. याचे एक चक्र सुरू होते, ज्यामुळे ढग तयार होतात. पाण्याचे बाष्पीभवन होत असताना अधिक ढग तयार होऊ लागतात. यामुळे एक वादळ चक्र तयार होते, जे पृथ्वीप्रमाणेच फिरत राहते.

या वाऱ्याचा वेग 62 किमी/ताशी येईपर्यंत या वादळ प्रणालींना उष्णकटिबंधीय वादळे म्हणतात. जेव्हा वाऱ्याचा वेग 120 किमी/ताशी पोहोचतो तेव्हा ही वादळे चक्रीवादळ बनतात. चक्रीवादळे सहसा थंड भागात तयार होत नाहीत, कारण त्यांना तयार होण्यासाठी समुद्राच्या उबदार पाण्याची आवश्यकता असते. जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी, समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 25-26 अंश असणे आवश्यक आहे.  (Maharashtra News)

चक्रीवादळाच्या धोक्याची तीव्रता कशी ओळखतात?

समुद्रात जवळजवळ वर्षभर चक्रीवादळे तयार होतात, परंतु ती सर्वच धोकादायक नसतात. यापैकी पृथ्वीकडे सरकणारी चक्रीवादळं धोकादायक असतात. या चक्रिवादळांच्या धोक्याची पातळी ही त्यांच्या वेगावरुन ठरवली जाते.

सौम्य चक्रीवादळ: सौम्य चक्रीवादळाच्या वाऱ्याचा वेग ६२ ते ८८ किमी/तास आहे. या वेगाच्या चक्रिवादळाचा धोका अत्यंत कमी असतो.

तीव्र चक्रीवादळ: या चक्रीवादळात वाऱ्याचा वेग 89 ते 120 किमी/ताशी असतो. समुद्रातील नौका किंवा जहाजांसाठी हे धोकादायक ठरू शकतात.

अतिशय तीव्र चक्रीवादळ : 118 ते 165 किमी/ताशी वेगाने वारे असलेल्या चक्रीवादळांना तीव्र म्हणतात. हे चक्रीवादळ जेव्हा जमिनीकडे सरकतात तेव्हा जीवित आणि मालमत्तेचे नुकसान होऊ शकते.

अत्यंत तीव्र चक्रीवादळ : अत्यंत तिव्र चक्रीवादळे जिवीत तसेच भौतिक हानी करु शकतात. या वादळामध्ये वाऱ्याचा वेग १६६-२२० किमी/तास असतो.

ऑक्टोबर महिन्यातच चक्रीवादळे का तयार होतात?

दिवाळीनंतर ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर महिन्यात जास्तीत जास्त चक्रीवादळांची संकटी येत असतात. हिंद महासागर, बंगालची खाडी आणि अरबी समुद्रात ही वादळे तयार होतात. प्रतिवर्षी पाच चक्रीवादळे या काळात तयार होत असतात. ही चक्रीवादळे प्रामुख्याने ऑक्टोबर महिन्यातच तयार होण्याची कारणे म्हणजे नैऋत्य मोसमी पावसाने माघार घेतल्यानंतर समुद्राचे तापमान वाढते, त्यामुळे बंगालच्या उपसागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते. त्यावेळी समुद्राच्या परिसरात ओलावा जास्त असतो.

अशा परिस्थितीत जेव्हा दक्षिण चीन समुद्रातील वारे बंगालच्या उपसागरात पोहोचतात तेव्हा त्यांना अनुकूल परिस्थिती मिळते आणि त्यांचे चक्रीवादळात रूपांतर होते. गेल्या 131 वर्षांच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात 61 आणि अरबी समुद्रात 32 चक्रीवादळे आली आहेत.

Cyclone Mandous
Law Against Love Jihad: महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात कायदा लागू करण्याची तयारी
कालांतराने चक्रीवादळे सौम्य कशी होतात?

सुरूवातीला प्रचंड उग्र रुप धारण करणाऱ्या चक्रीवादळांची तीव्रता कालांतराने कमी होते. याचे महत्वाचे कारण म्हणजे चक्रीवादळे जमिनीवर पोहोचल्यानंतर काही तास किंवा दिवसांनी कमकुवत होऊ लागतात, कारण ते उबदार समुद्राच्या पाण्यातून मिळणारी ऊर्जा आणि आर्द्रता गमावतात. तरीही अनेक वेळा चक्रीवादळे जमिनीवर दूरवर जातात आणि त्यांच्यासोबत मुसळधार पाऊस आणि वारा घेऊन येतात, ज्यामुळे मोठी हानी होण्याचा धोका निर्माण होतो. चक्रीवादळे अनेक दिवस किंवा आठवडे टिकू शकतात, परंतु मोठ्या भूभागावर किंवा थंड समुद्रावरून जाताना ते मंद होतात आणि विरून जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com