Law Against Love Jihad: महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात कायदा लागू करण्याची तयारी

Law Against Love Jihad In Maharashtra: राज्यात लव्ह जिहादची प्रकरणं वाढत असल्याने लव्ह जिहाद विरोधात कायदा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Law Against Love Jihad In Maharashtra
Law Against Love Jihad In MaharashtraSaam Tv
Published On

सुशांत सावंत, मुंबई

Law Against Love Jihad: महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्यासाठी राज्य सरकार तयारी करत आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधात कायदा मंजूर करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे. राज्यात लव्ह जिहादची (Love Jihad) प्रकरणं वाढत असल्याने लव्ह जिहाद विरोधात कायदा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (Love Jihad News)

Law Against Love Jihad In Maharashtra
Shraddha Walker Case: धर्म जागृती झाली पाहीजे, १८ वर्षांनंतरच्या स्वातंत्र्यावर विचार व्हावा; श्रद्धाचे वडील काय म्हणाले?

उत्तर प्रदेशातील लव्ह जिहाद कायद्याती तरतूदी:

१) लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर, कोणाशीही खोटं बोलून विवाह करणं, अशा विवाहाला सहाय्य करणं हे कायद्यानुसार गुन्हे आहेत.

२) यात दोषी असल्याचं सिद्ध झालं, तर आरोपीला 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दोन लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

३) यातली पीडित मुलगी 18 वर्षांपेक्षा लहान असेल किंवा अनुसूचित जाती वा जमातीची असेल, तर चार ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि कमीत-कमी तीन लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.

४) कोणती संस्था-संघटना या गुन्ह्यात सहभागी असेल, तर तीन ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.  (Maharashtra News)

Law Against Love Jihad In Maharashtra
Navi Mumbai News : लिप्टमध्ये छकुलीवर अत्याचार, उलट्यांमुळे पालक धास्तावले; युवकास पाठलाग करुन पकडले

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण आणि लव्ह जिहाद

दिल्लीत प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरून हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. प्रियकर आफताबने हत्या करुन प्रेयसी श्रद्धाच्या शरीराचे तब्बल ३५ तुकडेही केले. दिल्ली येथील मेहरौली परिसरात घडलेल्या या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली आहे. या खळबजनक घटनेवर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी सदर प्रकरण हे लव्ह जिहाद प्रकरण असल्याचा आरोप केला आहे. 'आंतरधर्मीय विवाह कायद्यात बदल व्हावा, अशी मागणी बोंडे यांनी केली होती

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com