Bus Accident: चालकाला हार्ट अटॅक आला, ४० प्रवाशांना घेऊन जाणारी भरधाव बस उलटली

Himachal Pradesh Accident : चंबा ते उना जाणारी एक खाजगी बस कांग्रामध्ये उलटल्याने अनेक प्रवासी जखमी झाले. बस चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने हा अपघात झाल्याचे मानले जात आहे.
Himachal Pradesh Accident  :
Rescue teams assist injured passengers after a private bus overturned near Nurpur in Kangra district.saam tv
Published On
Summary

कांग्रामध्ये भीषण बस अपघात

चालकाला हृदयविकाराचा झटका

४० प्रवाशांपैकी २२ जखमी

हिमाचल प्रदेशातील कांग्रा जिल्ह्यातील नूरपूर परिसरात एक भीषण रस्ते अपघात झाला. चंबाहून उनाकडे जाणारी एक खासगी बस भरधाव वेगाने जात होती. बस नियाजपूरजवळ आली असताना बस अचानक अनिंयत्रित झाली आणि उलटली. या बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते, त्यापैकी अंदाजे २२ जण जखमी झाले.

Himachal Pradesh Accident  :
Accident News : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेल्या बसला अज्ञात वाहनाची धडक; १६ जण गंभीर जखमी

प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे बस अनिंयत्रित झाली आणि उलटली, असं सांगितलं जात आहे. चालकाची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या कडेला उलटली. हा अपघात इतका अचानक घडला की प्रवाशांना काही घडलं ते समजलेच नाही.

Himachal Pradesh Accident  :
Accident: धावत्या कारवर कोसळलं भलं मोठं झाड, ४ शिक्षिकांचा जागीच मृत्यू

जखमींवर उपचार सुरू

अपघातानंतर स्थानिक आणि अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना तात्काळ नूरपूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बहुतेक जखमींची प्रकृती स्थिर आहे, परंतु तिघांची प्रकृती गंभीर आहे. टांडा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय पथके घटनास्थळी दाखल झाली. नूरपूरचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे. संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बस उलटल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. अनेक जण आत अडकले होते, त्यांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर काही काळ रस्त्यावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com