Shocking News: नवऱ्याचा गर्लफ्रेंडसोबत सुरू होता रोमान्स; बेडरूममधील दृश्य बघून बायको हादरलीच; हायव्होल्टेज ड्राम्याचा VIDEO व्हायरल

Girlfriend-Boyfriend Shocking Video: नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध बायकोला माहिती पडले. नवरा गर्लफ्रेंडच्या घरी राहत होता. अशामध्ये बायकोने नवऱ्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी जाऊन जोरदार राडा केला. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Shocking News: नवऱ्याचा गर्लफ्रेंडसोबत सुरू होता रोमान्स; बेडरूममधील दृश्य बघून बायको हादरलीच; हायव्होल्टेज ड्राम्याचा VIDEO व्हायरल
Girlfriend-Boyfriend Shocking VideoSaam Tv
Published On

विवाहबाह्य संबंध असलेल्या नवऱ्याला बायकोने चांगलाच धडा शिकवल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. या महिलेने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडले. एका फ्लॅटमध्ये नवरा आणि त्याची गर्लफ्रेंड रोमान्स करत असताना अचानक ही महिला तिथे पोहचली. त्यावेळी तिने नवरा आणि त्याच्या गर्लफ्रेंडला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं आणि त्यावरून ती प्रचंड संतापली. या महिलेने नवऱ्यासह त्याच्या गर्लफ्रेंडला चांगलाच चोप दिला. या हाय वोल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक महिला आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत नवऱ्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी पोहचते. या महिलेने नवरा आणि त्याच्या गर्लफ्रेंडला ज्या अवस्थेत पाहिले ते पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. ही महिला नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचे केस ओढत तिला चोप देते. यावेळी तिचा नवरा तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण ती शांत राहत नाही आणि ती जोरदार तमाशा करते. या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी या घटनेचा व्हिडीओ काढला जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shocking News: नवऱ्याचा गर्लफ्रेंडसोबत सुरू होता रोमान्स; बेडरूममधील दृश्य बघून बायको हादरलीच; हायव्होल्टेज ड्राम्याचा VIDEO व्हायरल
Shocking Video: ट्रेनच्या बाहेर वाकला अन् थोडक्यात जीव वाचला; तरुण नव्हे, तर काकांनीच केला थरारक स्टंट

ही संपूर्ण घटना मेरठच्या फूलबाग कॉलनीतील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पती गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्या गर्लफ्रेंडसोबत भाड्याच्या घरात राहत होता. पत्नीला त्याच्यावर संशय आला होता. नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल माहिती कळताच महिला प्रचंड संतापली. तिने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने नवऱ्याचा शोध घेतला. नवरा त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी होता त्याचवेळी ही महिला तिथे पोहचली. यानंतर तिने बराच गोंधळ घातला.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नारंगी रंगाचा ड्रेस घातलेली महिला एका महिलेला मारत आहे. त्यावेळी तिचा नवरा आपल्या गर्लफ्रेंडला बायकोच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करतो. तो त्याच्या गर्लफ्रेंडला पाठीमागे उभं करून बायकोला अडवण्याचा प्रयत्न करतो. पण त्याची बायको देखील त्याची कॉलर पकडून त्याला ढकलून त्याच्या गर्लफ्रेंडला मारण्याचा प्रयत्न करते. दोघी एकमेकींना प्रचंड शिवीगाळ करतात. यावेळी या महिलेचा नवरा तिला शांत होण्याची विनंती करताना दिसतो. तसंच त्याच्या नातेवाईकांना व्हिडीओ काढू नका असे सांगतो. दोन्ही महिलांनी एकमेकांना चांगलीच मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चर्चेचा विषय बनला आहे.

Shocking News: नवऱ्याचा गर्लफ्रेंडसोबत सुरू होता रोमान्स; बेडरूममधील दृश्य बघून बायको हादरलीच; हायव्होल्टेज ड्राम्याचा VIDEO व्हायरल
Shocking Video: मूड ऑफ झाला अन् हद्द ओलांडली, पठ्ठ्या २५ मजल्यावर गेला अन्... ; व्हिडिओ पाहून धडकी भरेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com