Shocking Video: मूड ऑफ झाला अन् हद्द ओलांडली, पठ्ठ्या २५ मजल्यावर गेला अन्... ; व्हिडिओ पाहून धडकी भरेल
Greater Noida: सोशल मीडियावर एक थरकाप उडवणारा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण थेट २५ मजल्याच्या इमारतीच्या कडेला जाऊन बसलेला दिसतो. अगदी कोपऱ्यावर बसलेला तो तरुण क्षणाक्षणाला खाली कोसळेल की काय, अशी भीती निर्माण करणारा हा व्हिडिओ अनेकांची झोप उडवत आहे.
एक पाऊल चुकलं असतं, तर...
व्हायरल (Viral) झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की, २५ मजली इमारतीच्या कठड्याला तो तरुण बसलेला आहे. रात्रीची वेळ असल्याचे तरुणाचा चेहरा स्पष्टपणे दिसून येत नाही. तरुणाच्या चेहऱ्यावर भीतीचा जराही लवलेशही नाही उलट तो शांतपण समोर पाहत बसलेला आहे. खाली पाहिले तर दरीसारखा परिसर दिसत आहे. परिसरात वाऱ्याचा जोर जास्त आहे. ही दृश्य पाहून प्रत्येकाच्या अंगावर शहारे नक्कीच येतील.
संपूर्ण घटना बाजूच्या बिल्डिंगवरुन एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केली असून सध्या एक्सवरील @SachinGuptaUP या अकाउंटवर अपलोड केली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,तरुण मंद्यधुद अवस्थेत मूड ऑफ झाल्याने तसं बसला होता'' असे समजत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ देशभर वाऱ्याच्या वेगाने पसरलेला आहे.
ही घटना ग्रेटर नोएडा पश्चिमेमधील असल्याचे समजत आहे, मात्र साम टीव्ही याची पुष्टी करत नाही. अनेक सोशल मीडिया युजर्संनी हा क्लिप शेअर करत त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. कोणी याला स्टंट(Stunt) म्हटलं आहे, तर काहींनी म्हटलं आहे की, हा तरुण मानसिक तणावात असावा. मूड ऑफ झाल्यानं त्याने असा धोकादायक निर्णय घेतल्याचंही काहींनी म्हटलंय.
टीप: तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.