Heavy Rainfall: पावसाचा रौद्रावतार! पूर अन् भूस्खलनामुळे ४० जणांचा मृत्यू, जनजीवन पूर्णत: विस्कळीत

Nepal Heavy Rainfall: नेपाळमध्ये पावसाने हाहाकार केला आहे. मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या. यामध्ये ४० जणांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहेत.
Heavy Rainfall: पावसाचा रौद्रावतार! पूर अन् भूस्खलनामुळे ४० जणांचा मृत्यू, जनजीवन पूर्णत: विस्कळीत
Nepal Heavy RainfallSaam Tv
Published On

Summary -

  • नेपाळला मुसळधार पावसाने झोडपून काढलं.

  • या पावसामुळे नेपाळमध्ये ४० जणांचा मृत्यू झाला.

  • अनेक ठिकाणी भूस्खलन आणि पूरामुळे वाहतूक ठप्प झाली.

  • कोसी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

नेपाळला मुसळधार पावसाने झोडपून काढलं. या पावसामुळे नेपाळमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे भूस्खलन आणि महापूर आला आहे. रस्ते बंद झालेत, पूल वाहून गेले. पावसामुळे झालेल्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला. अनेक जण बेपत्ता झाले आहेत. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.

Heavy Rainfall: पावसाचा रौद्रावतार! पूर अन् भूस्खलनामुळे ४० जणांचा मृत्यू, जनजीवन पूर्णत: विस्कळीत
Akola Flood: दु:ख कोणाला सांगयचं! बैलजोडीसह गाडी पुरात बुडाली; शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत 'नंदी राजा'चा मृत्यू

नेपाळ पोलिसांनी सांगितले की, वेगवेगळ्या ठिकणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला. दक्षिण नेपाळमध्ये वीज पडून ३ जणांचा मृत्यू झाला. उदयपूर जिल्ह्यामध्ये पूरामध्ये वाहून जाऊन एका व्यक्तीचा मृ्त्यू झाला. ११ जण पूरात वाहून गेले. त्यांचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी बचाव केले जात आहे. पण खराब हवामानामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत.

Heavy Rainfall: पावसाचा रौद्रावतार! पूर अन् भूस्खलनामुळे ४० जणांचा मृत्यू, जनजीवन पूर्णत: विस्कळीत
Pandharpur Flood Alert : पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी भयान अवस्था, पूरस्थितीचा व्हिडिओ

हायवेवर भूस्खलन झाल्यामुळे तो बंद करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पूल पूरात वाहून गेले. अनेक प्रवासी अडकले आहेत. प्रशासनाकडून पूरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी जवान आणि स्थानिक प्रशासनाची टीम मदत कार्य करत आहे. विमानसेवेवर देखील परिणाम झाला आहे.

Heavy Rainfall: पावसाचा रौद्रावतार! पूर अन् भूस्खलनामुळे ४० जणांचा मृत्यू, जनजीवन पूर्णत: विस्कळीत
Maharashtra Flood : पुराने होत्याचं नव्हतं केलं, २ वर्षांची मुलगी अन् १० वर्षांचा मुलगा गेला वाहून, संभाजीनगरवर शोककळा

दक्षिण-पूर्व नेपाळमधील कोसी नदी ही दरवर्षी बिहारमध्ये येणाऱ्या पूराला कारणीभूत ठरते. या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या शहरं आणि गावांना इशारा देण्यात आला आहे. नेपाळमध्ये यावर्षी पावसामुळे आतापर्यंत १०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. तर १२ पेक्षा अधिक जण बेपत्ता आहेत.

Heavy Rainfall: पावसाचा रौद्रावतार! पूर अन् भूस्खलनामुळे ४० जणांचा मृत्यू, जनजीवन पूर्णत: विस्कळीत
Floods: पावसाचा हाहाकार! एअरपोर्ट, शाळा- कार्यालय बंद; रस्ते ब्लॉक, नेपाळमध्ये २४ तासापासून मुसळधार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com