

New Delhi : सदेशाची राजधानी दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिल्लीत मुसळधार पावसाने मोडला ४१ वर्षाचा रेकॉर्ड आहे. १९८२ नंतर पहिल्यांदाच एका दिवशी पडला १५२ मिमी पाऊस दिल्ली पडला आहे. दिल्ली, हिमाचल, पंजाबसह उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे.
या अगोदर राजधानी दिल्लीत २५ जुलै १९८२ मध्ये १६९.९ मिमी पाऊस पडला होता. २००३ मध्ये १३३.४ मिमी पाऊस पडला होता. तर २०१३ मध्ये दिल्लीत १२३.४ मीमी पाऊस पडला होता.
यमुनेच्या पाण्याची पातळी वाढण्याची प्रक्रिया सुरूच आहे. शनिवारी दिल्लीत १२ तासांत १२६ मिमी आणि गेल्या २४ तासांत १५० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. गेल्या २४ तासांत या संपूर्ण हंगामात पडणाऱ्या पावसापैकी २० टक्के पाऊस झाला आहे. (Latest News Update)
हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यातील औट येथे ५० वर्ष जुना पूल वाहून गेला. तसेच कुल्लू, कसोल या पर्यटननगरीतील पार्किंगमधून 10 वाहने पार्वती नदी कसोलमध्ये वाहून गेली. तसेच कुल्लूमध्ये बियासमध्ये एकही गाडी वाहून गेली नाही.
जम्मू-कश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये लष्कराचे दोन जवान पोशाना नदी पार करताना बुडाले आहेत. हिमाचल प्रदेश मध्ये ५, जम्मू कश्मीरमध्ये २ आणि उत्तर प्रदेशमध्ये ४ लोकांचा पावसामुळे मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.