IMD Report: देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा; तर काही भागात जोरदार पावसाची शक्यता; वाचा IMD रिपोर्ट

IMD Report For Heatwave: देशभरात कडाक्याचे ऊन वाढत आहे. नागरिकांना उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाच्या त्रासामुळे घराबाहेर पडणेदेखील कठीण झाले आहे. देशात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 45.6 अंश सेल्सियस आहे.
IMD Report For Heatwave
IMD Report For HeatwaveSaam Tv

देशभरात कडाक्याचे ऊन वाढत आहे. नागरिकांना उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाच्या त्रासामुळे घराबाहेर पडणेदेखील कठीण झाले आहे. देशात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 45.6 अंश सेल्सियस आहे. हवामान खात्यानुसार, यापुढे काही दिवस उन्हाचा तडाखा आणथी वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी जारी भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने म्हटले आहे की, पूर्व आणि दक्षिण भारतात आणखी ५ दिवस उन्हाची लाट येण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंडच्या काही भारात १ मे आणि २ मे रोजी उष्णतेचा तडाखा कायम असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रायलसीमा, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेशमधील काही भागात ३ मेपर्यंत उष्णतेची लाट येऊ शकते. तर २९-३० एप्रिलदरम्यान कोकण, पूर्व उत्तर प्रदेशात उष्णतेच्या तीव्र झळा बसतील, असे सांगण्यात येत आहे.

सोमवारी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागात कमाल तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सियस होते.पूर्व प्रदेश, बिहार, झारखंड, आंध्र प्रदेश, यानम या भागांमध्ये ४० ते ४२ अंश सेल्सियस तापमान होते. तर महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातदेखील ४० ते ४२ अंश सेल्सियस तापमान होते. पश्चिम बंगालच्या अनेक भागात तापमान सामन्य तापमानापेक्षा ४ ते ८ अंश सेल्सियसपेक्षा जास्त होते. IMD ने एप्रिल- जूनमध्ये देशातील बहुतांश भागात कडक उन्हाचा इशारा दिला आहे. पुढील १०-२० दिवस तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.

IMD Report For Heatwave
Car Fire: धावणाऱ्या वाहनांना आग का लागते? काय आहे कारण, कसा कराल बचाव?

देशात एकीकडे तापमान वाढत आहे. तर दुसरीकडे वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व अफगाणिस्तान आणि वायव्य राजस्थानवर चक्रिवादळामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेशमध्ये विजांचा कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये गारपीट तर जम्मू काश्मीर, मुझफ्फराबाद येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.

IMD Report For Heatwave
Hair Care Tips: उन्हाळ्यात केसगळतीवर रामबाण उपाय ठरेल एरंडेल तेल; हा हेअर मास्क ठरेल फायदेशीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com