Accident : दसऱ्याच्या दिवशी भीषण अपघात; भरधाव कार कालव्यात कोसळली, एका कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

haryana car accident : दसऱ्याच्या दिवशी भीषण अपघात घडला आहे. भरधाव कार कालव्यात कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
दसऱ्याच्या दिवशी भीषण अपघात; भरधाव कार कालव्यात कोसळली, एका कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
haryana big accident Saam tv
Published On

haryana accident : हरियाणात शनिवारी भीषण अपघाताची घटना घडली आहे. हरियाणात दसऱ्याच्या दिवशी कारचा भीषण अपघात घडला आहे. भरधाव कार कालव्यात कोसळून ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. या अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या कैथलमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. हरियाणातील कैथलमध्ये कालव्यात कार कोसळून एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि चार मुलींचा समावेश आहे. या कारमध्ये एकूण ९ जण होते. ते कुटुंब दसऱ्यानिमित्त बाबा राजपुरीच्या मेळ्याला निघाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, चालकाने कारवरील नियंत्रण गमावलं, त्यानंतर कार मुंदरी गावातील कालव्यात कोसळली.

पोलिसांच्या माहितीनुसार, या अपघात चालकाचा जीव वाचला आहे. या वाहनातील सात जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १२ वर्षीय कोमल नावाची मुलगी बेपत्ता आहे. तिचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सतविंदर (५०), चमेली (६५), तीजो (४५), फिजा (१६), रिया (१०), रमनदीप(६) यांचा मृत्यू झाला आहे. कैथलच्या डीग गावात सर्व राहणारे होते. कुटुंबातील सर्व मेळ्यास जायला निघाले होते.

दसऱ्याच्या दिवशी भीषण अपघात; भरधाव कार कालव्यात कोसळली, एका कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
Jalgaon Accident : घरापासून काही अंतरावर गेले अन् काळाचा घाला; अपघातात पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी

कैथलचे पोलीस उपअधीक्षक ललित कुमार यांनी सांगितले की, 'एका कुटुंबातील ८ जण मेळ्याला जायला निघाले होते. या कुटुंबीयांची गाडी मुंदरी गावात पोहोचली. त्यानंतर चालकाने कारवरील नियंत्रण गमावलं, त्यानंतर त्यांची कार कालव्यात कोसळली. या अपघातात चालकाचा जीव वाचला आहे. एक मुलगी अद्याप बेपत्ता आहे.

दसऱ्याच्या दिवशी भीषण अपघात; भरधाव कार कालव्यात कोसळली, एका कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
Pune Accident : हिट अँड रनच्या घटनेनं पुणे पुन्हा हादरलं; अलिशान कारच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

PM मोदींनी दु:ख केलं व्यक्त

कैथलमधील झालेल्या अपघातानंतर पंतप्रधान मोदींनी दु:ख व्यक्त केलं. त्यांनी पोस्ट करत म्हटलं की, 'हरियाणातील झालेला भीषण अपघात हा हृदयद्रावक आहे. यामध्ये अपघातात मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबीयाप्रती संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना या दु:खातून बाहेर पडण्याची शक्ती देवो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन मदतकार्यात लागली आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com