IPS अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, DGP सह १४ जणांविरोधात गुन्हा

IPS Officer Poonan Kumar Case: आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली. या प्रकरणी डीजीपींसह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली.
IPS अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, DGP सह १४ जणांविरोधात गुन्हा
IPS Officer Poonan Kumar Saam tv
Published On

Summary -

  • हरियाणाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट

  • या प्रकरणी डी १४ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल.

  • डीजीपी शत्रुजीत कपूर यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांविरोधात कारवाई

  • ९ पानी सुसाईड नोटमध्ये जातीय भेदभाव आणि मानसिक छळाचे आरोप करण्यात आले

हरियाणाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पूरन कुमार यांच्या आत्महत्येच्या दोन दिवसानंतर याप्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत डीजीपी शत्रुजीत सिंह कपूरसह १४ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १०८ म्हणजेच आत्महत्येस प्रवृत्त करणे, ३(५), ३ (१) आर आणि एससी/ एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये १४ जणांवर गंभीर आरोप केले होते. त्यांनी ९ पानांचे सुसाईट नोट लिहिले होते. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी डीजीपी शत्रुजीत कपूर आणि रोहतकचे एसपी नरेंद्र बिजारनिया यांच्यासह १४ जणांची नावं आहेत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा पुरन कुमार यांच्या कुटुंबीयांनी घेतला. त्यानंतर या घटनेप्रकरणी सेक्टर -११ पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला होता.

IPS अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, DGP सह १४ जणांविरोधात गुन्हा
IPS अधिकाऱ्यानं घरातच आयुष्य संपवलं, IAS पत्नीकडून गंभीर आरोप, संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

वाय पूरन कुमार यांनी सुसाईड नोटमध्ये १४ जणांची नाव लिहित या सर्वांनी त्यांचा मानसिक छळ, जातीय भेदभाव केला असल्याचे लिहिले होते. यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते. यातूनच त्यांनी घरामध्ये एकटे असताना टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. त्यांनी ७ ऑक्टोबरला सेक्टर ११ मधील राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

IPS अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, DGP सह १४ जणांविरोधात गुन्हा
IPS अधिकाऱ्याने आयुष्य का संपवलं? ९ पानी चिठ्ठीतून झाला धक्कादायक उलगडा

हरियाणातील वरिष्ठ आयएएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या पत्नी अमनीत पी. ​​कुमार या जपानला गेल्या होत्या. त्यांना नवऱ्याच्या आत्महत्येचे वृत्त कळताच त्या जपानहून परत आल्या. त्यानंतर बुधवारी त्यांनी चंदीगड सेक्टर ११ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली . वाय पूरन कुमार यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, त्यांना वर्षानुवर्षे वांशिक भेदभाव सहन करावा लागत होता. जेव्हा त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना त्रास देण्यात आला.

IPS अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, DGP सह १४ जणांविरोधात गुन्हा
Crime News : IPS असल्याचे सांगून लोकांना चुना लावायच्या, पुण्यात मायलेकीचा भंडाफोड, नेमकं जाळ्यात अडकल्या कशा?

या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले अधिकारी -

- शत्रुघ्न कपूर, डीजीपी हरियाणा

- अमिताभ ढिल्लन , एडीजीपी

- संजय कुमार, एडीजीपी , 1997 बॅच

- पंकज नैन, आयजीपी २००७ बॅच

- कला रामचंद्रन , आयपीएस , १९९४ बॅच

- संदीप खिरवार , आयपीएस १९९५ बॅच

- सिबाश कविराज, IPS 1999 बॅच

- मनोज यादव, माजी डीजीपी , आयपीएस १९८८ बॅच

- पीके अग्रवाल , माजी डीजीपी , आयपीएस १९८८ बॅच

- टीव्हीएसएन प्रसाद, आयएएस १९८८ बॅच

- नरेंद्र बिजार्निया , एसपी रोहतक

- राजीव अरोरा , माजी एसीएस

- कुलविंदर सिंग, आयजी मधुबन

- माता रवी किरण, एडीजीपी , कर्नाल रेंज

IPS अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट, DGP सह १४ जणांविरोधात गुन्हा
Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची, सलग चारवेळा अपयश; शेवटच्या प्रयत्नात UPSC क्रॅक; फॅक्टरी कामगाराची लेक झाली IPS

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com