अतिरिक्त पोलीस महासंचालकांनंतर सहायक उपनिरीक्षकांनी आयुष्य संपवलं; पोलीस दलात पुन्हा खळबळ, हरियाणात नेमकं काय घडतंय?

Haryana ASI news : अतिरिक्त पोलीस महासंचालकांनंतर आता सहायक उपनिरीक्षकांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेने पोलीस दलात पुन्हा खळबळ उडाली आहे.
 Haryana police crisis
Haryana ASI news : Saam tv
Published On
Summary

रोहतकच्या सायबर सेलमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या

पोलिस अधिकाऱ्यांकडून आत्महत्येपूर्वी ३ पानी चिठ्ठी आणि व्हिडिओ रेकॉर्ड

अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या आत्महत्येनंतर काही दिवसांतच घडली

हरियाणाच्या रोहतकमधये सायबर सेलमध्ये कार्यरत असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकांनी स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षकांनी आत्महत्या करण्याआधी ३ पानी चिठ्ठी लिहिली. तसेच एका व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला. हरियाणा पोलीस दलात एकापाठोपाठ एक आत्महत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 Haryana police crisis
Karjat Tragedy : झाडांची पाने तोडणं पडलं महागात; विद्युत तारेचा शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू, २ मुले झाली पोरकी

सहायक पोलीस उपनिरीक्षक संदीप लाठर असे आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षकांनी आत्महत्या करण्याआधी लिहिलेल्या ३ पानी चिठ्ठीत आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे . 'वाय पूरन कुमार भ्रष्टाचारी होते. ते जातीयवादाचा आधार घेत व्यवस्था हायजॅक करण्याचा प्रयत्न करत होते.

 Haryana police crisis
Sharad Pawar : निवडणुकांच्या आधीच शरद पवारांची मोठी घोषणा, नवा डाव टाकला

संदीप लाठर यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत पुढे म्हटलं की, मी भ्रष्ट व्यवस्थेविरोधात बलिदान दिलं आहे. त्यांनी पूरन कुमार यांच्या कुटुंबाविरोधात निष्पक्ष चौकशीची मागणी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सहायक पोलीस उपनिरीक्षक संदीप लाठर हे या प्रकरणाचा तपास करत होते. त्यांचा आत्महत्येनंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

 Haryana police crisis
Pakistan Protest : नेपाळनंतर पाकिस्तान पेटलं! सुरक्षादलाच्या जवानांचा TLP कार्यकर्त्यांवर गोळीबार; 280 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा

संदीप लाठर यांनी काही दिवसांपूर्वी आयपीएस पूरन यांच्या टीममधील सुशील कुमार यांना अटक केली होती. सुशील यांच्यावर दारु व्यावसायिकांकडून महिन्याला वसुली केल्याचा आरोप होता. याच प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी संदीप लाठर यांच्यावर दिली होती. या प्रकरणात आयपीएस पूरन कुमार यांची पत्नी आयएएस अधिकाऱ्यांनी खळबळजनक गंभीर आरोप केला होता. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माझ्या पतीला अडवण्याचा प्रयत्न केला जात होता, असा आरोप पूरन कुमार यांच्या पत्नीकडून करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com