माजी मंत्र्याचे निधन; भाजपच्या अष्टपैलू नेतृत्वाचा तीन दशकांचा प्रवास थांबला, राजकारणात शोककळा

Harinarayan Rajbhar Death News: उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हरिनारायण राजभर यांचे निधन झाले. तीन दशकांचा त्यांचा राजकीय प्रवास संपला असून राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
Former Uttar Pradesh Minister and senior BJP leader Harinarayan Rajbhar, who passed away at the age of 76.
Former Uttar Pradesh Minister and senior BJP leader Harinarayan Rajbhar, who passed away at the age of 76.saam tv
Published On

उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिनारायण राजभर यांचे रविवारी निधन झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर ७६ वर्षीय राजभर यांना शनिवारी रात्री लखनऊ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Former Uttar Pradesh Minister and senior BJP leader Harinarayan Rajbhar, who passed away at the age of 76.
लोकसभेत घुमणार महिलांचा आवाज! संसदेत दिसणार आता 850 खासदार

राजभर यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन मुलगे आणि पाच मुली असा परिवार आहे. राजभर यांचा जन्म बलिया जिल्ह्यातील उभाओन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तंगुनिया गावात झाला. त्यांनी १९९१ आणि १९९६ मध्ये सियार विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते शारदानंद आंचल यांचा पराभव करून दोनदा आमदार म्हणून निवडणूक जिंकली.

Former Uttar Pradesh Minister and senior BJP leader Harinarayan Rajbhar, who passed away at the age of 76.
मुख्यमंत्र्यांनी सोडले शासकीय निवासस्थान! 14 एप्रिलला राजीनामा देणार; राजकीय वर्तुळात खळबळ

तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते मऊ जिल्ह्यातील घोसी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणूनही निवडून आले होते.आमदार म्हणून आपल्या कार्यकाळात, राजभर यांनी कल्याण सिंह, राम प्रकाश गुप्ता आणि राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारांमध्ये राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. त्यांच्या निधनाने भाजपवर दु:खाचा डोंगर कोसळला असून राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे,.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com