स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; केबिनमध्ये पुरूष अन् महिला आक्षेपार्ह स्थितीत, मालक पती-पत्नी फरार

Human Trafficking Unit: हरिद्वारच्या पेंटागॉन मॉलमधील स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचं उघड. एएचटीयूच्या धाडीत दोन पुरुष व पाच महिला रंगेहाथ अटक. स्पा सेंटरचे मालक अनुभव आणि त्यांची पत्नी शालू छाप्यानंतर पसार.
Haridwar Spa
Haridwar Spa Saam Tv
Published On
Summary
  • हरिद्वारच्या पेंटागॉन मॉलमधील स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचं उघड.

  • एएचटीयूच्या धाडीत दोन पुरुष व पाच महिला रंगेहाथ अटक.

  • स्पा सेंटरचे मालक अनुभव आणि त्यांची पत्नी शालू छाप्यानंतर पसार.

  • आरोपींवर अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, तपास सुरू.

हरिद्वारमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सिडकुल येथील पेंटागॉन मॉलमधील एका स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटनं केला. छापा टाकत त्यांनी आरोपींना रंगेहाथ पकडलं आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन पुरूष आणि पाच महिलांना अटक केली असून, स्पा सेंटर चालवणारे पती पत्नी फरार आहेत. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटनं गुड हॅपी स्पा अँड सलूनमध्ये अचानक धाड टाकली. त्यांना यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी धाड टाकण्याचा निर्णय घेतला. तपासादरम्यान, दोन वेगवेगळ्या केबिनमध्ये पुरूष आणि महिला आक्षेपार्ह स्थितीत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून आक्षेपार्ह साहित्य जप्त करून दोन्ही पुरूषांसह पाच महिलांना ताब्यात घेतलं आहे.

Haridwar Spa
आमदाराच्या मुलाच्या घराबाहेर आढळला मोलकरणीचा मृतदेह, शरीर अन् चेहऱ्यावर जखमा; नेमकं काय घडलं?

अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटचे प्रभारी विजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या पुरूषांची ओळख समोर आली आहे. सचिन आणि गणेश अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही ऋषिकेश येथील रहिवासी आहेत.

Haridwar Spa
शाळेत रक्तरंजित थरार; प्रार्थना सुरू असताना अंदाधुंद गोळीबार; २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, १७ गंभीर

स्पा सेंटरचे मालक अनुभव आणि त्यांची पत्नी शालू ही घटना उघडकीस येतात पसार झाले आहेत. हे जोडपं सिडकुलमधील आरके पुरम कॉलनीतील रहिवासी असल्याची माहिती आहे. हे दोघे मात्र, छाप्यानंतर पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com