Haj Yatra Death : दुर्दैवी! 1300 हज यात्रेकरूंचा मृत्यू; उष्णतेच्या लाटेनं घेतले बळी

Haj Yatra update : मक्कामध्ये उप्षघातामुळे 1300 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. उष्णतेच्या लाटेने अनके यात्रेकरूंचे बळी घेतले आहेत. यात इजिप्तसह भारतीय हज यात्रेकरूंचाही समावेश आहे.
दुर्दैवी! 1300 हज यात्रेकरूंचा मृत्यू; उष्णतेच्या लाटेनं घेतले बळी
Haj Yatra Death Saam tv
Published On

नवी दिल्ली : सौदी अरेबियामध्ये उष्णतेची लाटेचा फटका हज यात्रेकरूंना बसला आहे. या सौदी अरेबियाच्या हज यात्रेत आतापर्यंत १३०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या मृतांमध्ये इजिप्तच्या ६५८ जणांचा समावेश आहे. तर इंडोनेशिया १९९ तर भारतामधीलही ९८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.

सौदी अरेबिया सरकारने अद्याप नागरिकांच्या मृतांचा अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही. हज यात्रेला आलेल्या नागरिकांच्या मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. यात इजिप्तमधील मृत ६५८ हज यात्रेकरुपैकी ६३० जण विना पासपोर्ट आले होते. या घटनेनंतर सौदी अरबमध्ये इजिप्त तक्रार निवारण केंद्राची स्थापना केली आहे.

दुर्दैवी! 1300 हज यात्रेकरूंचा मृत्यू; उष्णतेच्या लाटेनं घेतले बळी
PM Narendra Modi Video: 'संसदेत वाद- प्रतिवाद हवा, गोंधळ अन् नाटक नको', अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी PM मोदी विरोधकांवर बरसले!

सीएनएन रिपोर्टच्या माहितीनुसार, सौदी अरबमध्ये हज यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरुंचे मृतदेह रस्त्यावर दिसत आहेत. यंदा उष्माघातामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे.

मक्कामध्ये किमान ४२ डिग्री सेल्सियम ते ५० डिग्रीपर्यंत तापमान पोहोचल्यामुळे हजारो हजयात्रेकरुंचा मृत्यू झाला आहे. तर सौदी अरबच्या सरकारच्या माहितीनुसार, आतापर्यंत २७०० हून अधिक हज यात्रेकरूंना स्ट्रोकचा त्रास झाल्याची माहिती समोर आली आहे.

हजला जाणारे अनेक यात्रेकरू प्रवासाआधी टूर ऑपरेटरचा सल्ला घेतात. या टूर ऑपरेटरकडून राहण्याची सोय, जेवण आणि चांगला प्रवास याचं आश्वासन दिले जाते. इजिप्तमधील खासदार महमूद कासिम यांनी टूर ऑपरेटर लोकांनी फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सुविधा न दिल्याने अडचणीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

दुर्दैवी! 1300 हज यात्रेकरूंचा मृत्यू; उष्णतेच्या लाटेनं घेतले बळी
Viral Video : ती ओरडली, किंचाळत राहिली पण मदतीला कोणीही आलं नाही; मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर १५ कुत्र्यांचा हल्ला

इजिप्तने हज यात्रेकरूंची फसवणूक करणाऱ्या टूर ऑपरेटरवर मोठी कारवाई केली आहे. पंतप्रधान मुस्तफा यांनी १६ कंपनन्यांचे परवाना रद्द करण्याचा आदेश दिलाे आहेत. या व्यतिरिक्त कंपन्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरु केली आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्यानंतर ट्यूनिशीयाचे राष्ट्राध्यक्षांनी धार्मिक प्रकरणाशी संबंधिक मंत्र्यांना निलंबित केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com