Haj Pilgrims Death: मक्केत सूर्य ओकतोय आग; तापमान ५२ अंशावर, उष्मघातामुळे ५५० हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू

Mecca Madina 51 Degree Temperature Pilgrims Death: हज यात्रेसाठी मक्का येथे जाणाऱ्या यात्रेकरुंचा उष्णतेमुळे मृत्यू होतोय. मक्केत तापमान ५२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
Haj Pilgrims Death: मक्केत सूर्य ओकतोय आग; तापमान ५२ अंशावर, उष्णतेमुळे ५५० हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू
Mecca Madina 51 Degree Temperature Pilgrims Death
Published On

हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला गेलेल्या जगभरातील ५५० यात्रेकरूंचा मृत्यू झालाय. या यात्रेकरूंचा मृ्त्यू अतिउष्मतेमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. दोन अरब राजदुतांनी एएफपीला सांगितले की, ५५० मृतांपैकी किमान ३२३ इजिप्शियन होते, त्यापैकी बहुतेक जण उष्णतेशी संबंधित आजारांमुळे मृत पावलेत.

राजदुताने दिलेल्या माहितीनुसार, मक्काच्या अल-मुइसिम येथील शवागारातून मृत्यूची आकडेवारी प्राप्त करण्यात आलीय. उष्माघातामुळे ५५० यात्रेकरूंचा मृत्यू झालाय.मृतांमध्ये ३२३ इजिप्शियन असून त्यांचा मृत्यू हा उष्मघातामुळे झालाय. एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, विविध देशातून आलेल्या वृत्तानुसार, मृतांची एकूण संख्या ही ५७७ झालीय.

यात जॉर्डन नागरिकांची संख्या ६० आहे. तर अम्मानकडून देण्यात आलेल्या वृत्तानुसार, मृतांची संख्या ४१ सांगण्यात आली होती. तर मक्काच्या अल-मुइसिम येथील शवागारातून देण्यात आलेल्या माहितीनुसार,५५० यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. हज हा इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे. सर्व मुस्लिम बांधव एकदा तरी येथे भेट देत असतात. यावर्षीही लाखो मुस्लीम बांधव हज येथे दाखल झालेत. परंतु मक्केत प्रचंड उष्णता असल्याने जगभरातून हजला जाणाऱ्या यात्रेकरूंचा मृत्यू होतोय. मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये अनेक मृतदेह रस्त्यांवर आणि डिव्हायडरवर पडलेले असल्याचं दिसत होतं. उष्णतेमुळे अनेकांची प्रकृती बिकट झालीय.

सौदीच्या राष्ट्रीय हवामान विज्ञान केंद्राने सांगितलं होतं की, मक्कामधील ग्रँड मशिदीचे तापमान सोमवारी ५१.८ अंश सेल्सिअस (१२५ फॅरेनहाइट) वर पोहोचलं होतं. सौदीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, उष्णतेने त्रस्त असलेल्या २,००० हून अधिक यात्रेकरूंवर उपचार करण्यात आले आहेत. परंतु रविवारपासून आकडेवारी अद्ययावत केली गेली नाही, ज्यामुळे मृत्यू आणि आजारी लोकांची संख्या जास्त असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

यात्रेकरूंना उष्णतेपासून वाचण्याच्या सूचना देण्यात आल्यात. यात्रेकरू आपल्या डोक्यावर थंड पाणी टाकत होते. तर काही स्वयंसेवकांकडून यात्रेकरुंना ठंड पेय, आईस्क्रिम आणि वेगाने वितळणारे चॉकलेट, वाटण्यात येत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com