हाफिज सईद पुन्हा भारतावर हल्ल्याच्या तयारीत, बांगलादेशातून...., 'त्या' व्हिडिओमुळे खळबळ

Hafiz Saeed Planning Attack on India: लष्कर कमांडर सैफुल्लाह सैफचा व्हिडिओ व्हायरल. हाफिज सईद बांगलादेशमार्गे भारतावर हल्ल्याची तयारी करत असल्याचा दावा.
Hafiz Saeed Planning Attack on India
Hafiz Saeed Planning Attack on IndiaSaam
Published On
Summary
  • बांगलादेशातून भारतावर हल्ला?

  • पाकिस्तानी सैन्याचं कौतुक

  • हाफिज सईदचा नवा प्लान काय?

लष्कर ए तोयबचा कमांडर सैफुल्लाह सैफ याने एका व्हिडिओमध्ये दावा केला की, हाफिज सईद आता बांगलादेशमार्गे भारतावर हल्ला करण्याची योजना आखत आहे. हा व्हिडिओ ३० ऑक्टोबर रोजी पाकिस्तानातील खैरपूर तामिवली येथे झालेल्या रॅलीदरम्यानचा असल्याचं सांगितले जात आहे.

व्हिडिओमध्ये सैफुल्लाह सैफ स्पष्टपणे म्हणताना दिसतो की, 'हाफिज सईद निष्क्रिय बसलेला नाही. तो बांगलादेशमार्गे भारतावर हल्ला करण्याची तयारी करत आहे'. त्याने दावा केला की, त्याचे लोक पूर्व पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्ये सक्रिय आहेत. तसेच भारताला प्रत्युत्तर देण्यास तयार आहेत.

Hafiz Saeed Planning Attack on India
कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी कपातीचे संकट! 'या' दिवशी १२ तास पाणी येणार नाही, कारण काय?

सैफुल्लाहने असेही म्हटलं की, स्थानिक तरूणांना जिहादसाठी तयार करण्यासाठी आणि दहशतवादी प्रशिक्षण देण्यासाठी बांगलादेशात एका साथीदार पाठवण्यात आला आहे. त्यामुळे बांगलादेश आता भारताविरूद्ध कट रचण्यासाठी लाँचपॅड बनत असल्याचा इशारा त्याने दिला.

या व्हिडिओमध्ये सैफु्ल्लाहच्या भाषणादरम्यान, अनेक लहान मुले उपस्थित असल्याचं दिसून येत आहे. ज्यामुळे असे सूचित होते की, काही दहशतवादी संघटना त्यांचे अजेंडे पुढे नेण्यासाठी मुलांचा वापर करीत आहेत. व्हिडिओच्या आधारे, पाकिस्तानी दहशतवादी संघटना मुलांना जिहादी विचारसरणीत शिकवत असल्याचा आरोप केला जात आहे.

Hafiz Saeed Planning Attack on India
पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणार साथ

सैफुल्लाह यांनी त्यांच्या भाषणात पाकिस्तानी सैन्याचं कौतुक केलं आहे. त्यांनी दावा केला की, ९- १० मेच्या रात्रीनंतर पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर दिलं. त्याने आणखी एक दावा करत म्हटलं की, अमेरिका आणि बांगलादेश सध्या पाकिस्तानच्या जवळ येत आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

हे सर्व दावे सध्या फक्त एका व्हायरल व्हिडिओवर आधारीत आहे. या गंभीर आरोपांची स्वतंत्र चौकशी केली जाईल. व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित प्रश्न निर्माण झाले असून, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com