Gyanvapi Case Update : ज्ञानवापी प्रकरणात मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का, अलाहाबाद उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Gyanvapi Case Update : अलाहाबाद उच्च न्यायालयाने 1991 च्या खटल्याच्या सुनावणीस मान्यता दिली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने पाच याचिका फेटाळल्या आहेत.
Gyanvapi Case
Gyanvapi CaseSaam TV
Published On

Gyanvapi Masjid Case News :

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का दिला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 1991 च्या खटल्याच्या सुनावणीस मान्यता दिली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने पाच याचिका फेटाळल्या आहेत.

न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या खंडपीठाने सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड आणि अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्या मालकी विवाद प्रकरणांना आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत.

न्यायालयाने म्हटले की, खटला देशातील दोन प्रमुख समुदायांना प्रभावित करतो. उच्च न्यायालयाने वाराणसी जिल्हा ट्रायल कोर्टाला सहा महिन्यांत या खटल्याचा निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com