Gujarat News: गुजरातमध्ये मोठी दुर्घटना, बोट उलटल्याने 6 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Vadodaras Harni Motnath Lake: गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील वडोदराजवळील हरणी तलावात बोट उलटल्याने सहा शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
Gujarat Vadodaras Harni Motnath Lake Six school students die after boat capsizes
Gujarat Vadodaras Harni Motnath Lake Six school students die after boat capsizes saam tv
Published On

Vadodara News:

गुजरातमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील वडोदराजवळील हरणी तलावात बोट उलटल्याने सहा शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेनंतर तात्काळ बचाव सुरु करण्यात आलं आहे.

या दुर्घटनेत मृत्यू झालेले मुलं वडोदरा येथील न्यू सनराईज स्कूलमधील असल्याचं सांगितलं जात आहे. या बोटीवर 27 विद्यार्थी होते, अशी माहिती मिळत आहे. या मुलांनी किंवा शिक्षकांपैकी कोणीही लाईफ जॅकेट घातलेले नव्हते. यातच बोट उलटल्यावर सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gujarat Vadodaras Harni Motnath Lake Six school students die after boat capsizes
Kalyan News: कल्याणमध्ये दरोडेखोरांचा प्लान फिस्कटला, पोलिसांना एक क्लू मिळाला, अन्...

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व्यक्त केलं शोक

दरम्यान, या अपघातावर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शोक व्यक्त केलं आहे. X वर पोस्ट करताना ते म्हणाले, 'वडोदराच्या हरणी तलावात बोट उलटल्यामुळे मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. प्राण गमावलेल्या मुलांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी मी प्रार्थना करतो.  (Latest Marathi News)

Gujarat Vadodaras Harni Motnath Lake Six school students die after boat capsizes
Anganwadi News: अंगणवाडी सेविकांना न्याय मिळणार का? वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

त्यांनी पुढे लिहिलं आहे की, या दु:खाच्या काळात त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना. देव त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. बोटीतील विद्यार्थी आणि शिक्षकांचे बचावकार्य सध्या सुरू आहे. अपघातातील जखमींना तातडीने मदत पोहोचवण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com