Accident : भीषण अपघात! कारचे झाले दोन तुकडे, आर्मी कुटुंबातील ३ चिमुकल्यांसह ७ जणांचा जागीच मृत्यू

Bhuj Khawda Highway Accident death Toll : गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात भुज-खवडा महामार्गावर कार आणि ट्रेलरची भीषण धडक झाली. या अपघातात तीन लहान मुलांसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारचे दोन तुकडे झाले.
Bhuj Khawda Highway Accident death Toll
Bhuj Khawda Highway Accident death Toll
Published On: 

Gujarat Kutch accident latest news :गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात तीन लहान मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला आहे. भुज-खवडा राष्ट्रीय महामार्गावर खवडा परिसराजवळ कार आणि ट्रेलरची जोरदार धडक होऊन ही दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. अपघातातील मृत हे आर्मी कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघात कसा झाला?

अधिकृत माहितीनुसार, खवडाजवळ कारची ट्रेलरला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्व ७ जण एकाच कुटुंबातील असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Bhuj Khawda Highway Accident death Toll
Accident Death : महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर; एकाच कुटुंबातील ९ जणांचा अपघाती मृत्यू, देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

कारचे २ तुकडे

मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब उत्तराखंडहून कच्छमध्ये फिरण्यासाठी आले होते. शनिवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास खवडा येथून भुजच्या दिशेने येत असताना वेकारिया परिसराजवळील वाळवंटाच्या भागात कार आणि ट्रेलरची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कार पूर्णपणे चेपली गेली आणि तिचे दोन तुकडे झाले. अपघातानंतर महामार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

Bhuj Khawda Highway Accident death Toll
Ramrao Vadkute Passes Away: भाजप खासदार रामराव वडकुतेंचं मध्यरात्री निधन, महाराष्ट्रावर शोककळा

या दुर्दैवी अपघातात लहान मुलांसह महिलांचाही समावेश आहे. यामध्ये पती-पत्नी, त्यांची ३ महिन्यांची चिमुकली, पिता-कन्या आणि आई-मुलगी असे नातेवाईक होते. यामध्ये सौरव सिंह, जसपाल सिंह नेगी, सविता सौरवसिंह नेगी, सिविका सौरवसिंह नेगी, रिंकी नितिन गुंसाई, वामिका नितिन गुंसाई, राजेशसिंह रावत आणि रक्षिता राजेश रावत या नावांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.