Gujarat Election : गुजरात निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, माजी मंत्र्याने सोडली कमळाची साथ

यंदा गुजरात विधानसभेत आम आदमी पक्षाने इन्ट्री केल्याने तिरंगी लढत होणार आहे
Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit ShahSaam TV
Published On

अहमदाबाद : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission)  गुजरात विधानसभेच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. त्यामुळे गुजरात विधानसभा काबीज करण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. अशातच, निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील भाजप सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेले जय नारायण व्यास यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Narendra Modi, Amit Shah
Maharashtra Politics : "सरकार पडणार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवलेत"

राजीनामा दिल्यानंतर जय नारायण व्यास काँग्रेस किंवा आम आदमी पक्षात सामील होणार असल्याची चर्चा आहे. कारण यापूर्वी जय नारायण व्यास यांची या दोन्ही पक्षाशी चर्चा झाली असल्याची माहिती आहे. यंदा गुजरात विधानसभेत (Gujrat Election) आम आदमी पक्षाने इन्ट्री केल्याने तिरंगी लढत होणार आहे. माजी आरोग्य मंत्री जय नारायण व्यास 2007 ते 2012 या काळात गुजरात सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यांना भाजपने बराच काळ बाजूला ठेवले होते.

आता ते कोणत्या पक्षात प्रवेश करतात हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेतली आहे. एवढेच नाही तर आम आदमी पक्षाच्या काही नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे आणि यावेळीही ते विजयाचा दावा करताना दिसत आहे. (Gujarat Vidhan Sabha Election 2022 Latest News)

Narendra Modi, Amit Shah
Nawab Malik : नवाब मलिक यांना मोठा धक्का! कोट्यवधींची संपत्ती ED ताब्यात घेणार

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शुक्रवारी 43 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, ज्यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते अर्जुन मोधवाडिया यांचे नाव प्रमुख आहे. पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मोधवाडिया यांना पोरबंदरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. यासोबतच अकोटातून ऋत्विक जोशी, रावपुरातून संजय पटेल आणि गांधीधाममधून भरत व्ही. सोलंकी यांना तिकीट देण्यात आले आहे.

गुजरात निवडणुकीचे वेळापत्रक

गुजरातमधील विधानसभेच्या एकूण १८२ जागांपैकी ८९ जागांसाठी १ डिसेंबरला आणि उर्वरित ९३ जागांसाठी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा निवडणुकीची अधिसूचना अनुक्रमे ५ नोव्हेंबर आणि १० नोव्हेंबरला जारी करण्यात येणार आहे. या निवडणुकांसोबतच २०२३ मध्ये होणाऱ्या अन्य काही राज्यांच्या निवडणुका २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com