GST Council Meeting: दसरा, दिवाळी गोड होणार; गुळासह 'या' वस्तूंच्या जीएसटीत कपात

Finance Minister Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची ६२ वी बैठक पार पडली
GST Council Meeting
GST Council MeetingSaam Digital
Published On

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची ६२ वी बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. जीएसटी परिषदेने दसरा, दिवाळी आधी देशातील जनतेला काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत गुळासह अनेक उत्पादनांवरील जीएसटीचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेनंतर याबाबत माहिती दिली.

याबाबत माहिती देताना निर्मला सीतारामन म्हणाल्या की, गुळावरील जीएसटीचा दर ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. आतापर्यंत गुळावर २८ टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. यासह जरीच्या धाग्यावरचा जीएसटी १८ टक्क्यांनी कमी करून ५ टक्के ठेवण्यात आला आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत बाजरी सारख्या भरड धान्यांवरीलही कर कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

GST Council Meeting
Afghanistan Earthquake Today: अफगाणिस्तान भूकंपाने हादरलं; १४ जणांचा मृत्यू

कोणत्याही प्रकल्पाच्या निर्मितीत ७० टक्के भरड धान्यांचा वापर होत असेल तर असा उत्पादनांवर कर आकारण्यात येणार नाही. मात्र, ही सवलत त्याचवेळी मिळेल ज्यावेळी वजनाच्या हिशोबाने या धान्यांचा उपयोग ७० टक्के असेल. आणि उत्पादनं ब्रॅंडिंग शिवाय असतील. उत्पादन ब्रॅण्डेड असेल तर ५ टक्के कर आकारण्यात येणार आहे. आतापर्यंत ब्रॅण्डेड आणि प्री-पॅकेज उत्पादनांवर १८ टक्के कर आकारण्यात येत होता. यासह अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आणल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.

GST Council Meeting
Israel vs Palestine: इस्राइलमधील भारतीयांनी 'या' भागात जाणं टाळा; केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com