Afghanistan Earthquake Today: अफगाणिस्तान भूकंपाने हादरलं; १४ जणांचा मृत्यू

Afghanistan Earthquake Today: अफगाणिस्तान भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. अफगाणिस्तान ६.३ रिश्टर तीव्र भूकंपामुळे हादरे बसले आहेत.
Earthquake
Earthquakesaam Tv
Published On

Afghanistan Earthquake Today

अफगाणिस्तान भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. अफगाणिस्तान ६.२ रिश्टर तीव्र भूकंपामुळे हादरे बसले आहेत. या भूकंपात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७८ जण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

अफगाणिस्तानात झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू हा हेरात शहराजवळील ४० किमी अंतरावर होता. अफगाणिस्तानात झालेला हा भूकंप दुपारी १२ वाजून ४२ वाजण्याच्या सुमारास झाला आहे. शहरातील अनेक इमारती कोसळल्याचंही वृत्त हाती आलं आहे. या घटनेमुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

अफगाणिस्तानात भूकंपाची मालिका सुरूच

तत्पूर्वी, अफगाणिस्तानात गेल्या वर्षी १४ सप्टेंबर रोजी मोठा भूकंप झाला आहे. त्यावेळी ४.३ तीव्रतेचा भूकंप झाला होता. अफगाणिस्तान गेल्या वर्षी मार्चमध्ये झालेल्या भूकंपात १३ जणांचा मृत्यू झाला होता.

तर गेल्या वर्षी जूनमध्ये ही भूकंप झाला होता. त्यावेळी ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. गेल्या वर्षी जून महिन्यात हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. तर १५०० जण जखमी झाले होते.

Earthquake
Israel Declares War: मोठी बातमी! पॅलेस्टाईनच्या रॉकेट हल्ल्यानं वातावरण चिघळलं; इस्रायलकडून युद्धाची घोषणा

काही दिवसांपूर्वी भूकंपाने दिल्ली हादरली

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिल्ली-एनसीआर देखील भूकंपाच्या धक्क्याने हादरली. दुपारी दोन वाजून ५३ मिनिटांनी हा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही जाणवले.

दिल्लीत झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. नागरिकांना १ मिनिटे भूकंपाचे धक्के जाणवले. उंच इमारती असेल्या भागातही भूकंपाची तीव्रता जाणवली. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घरातून बाहेर आले होते.

दिल्लीतील भूकंपामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. भूकंपानंतर घराबाहेर एकच गर्दी झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com