GST Council: राज्यांसाठी खुशखबर! 16982 कोटींची जीएसटी भरपाई मिळणार, ‘या’ वस्तूंवरील कर झाला कमी

वस्तू आणि सेवा कर (GST) संबंधीच्या जीएसटी परिषदेची 49 वी बैठक आज नवी दिल्लीत झाली.
Finance Minister Nirmala Sitharaman
Finance Minister Nirmala Sitharamansaam tv
Published On

Delhi: वस्तू आणि सेवा कर (GST) संबंधीच्या जीएसटी परिषदेची 49 वी बैठक आज नवी दिल्लीत झाली. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्यांवर, कर रचनेबाबत आणि सवलतीबाबत चर्चा करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

या बैठकीत जीएसटी अपीलीय न्यायाधिकरण, गुटखा आणि पान मसाल्यावर जीएसटी लावण्याविषयी निर्णय घेण्यात आला. तसेच  गेल्या पाच वर्षांपासूनची थकबाकी राज्यांना देण्यात येणार असल्याचीही घोषणा करण्यात आली.

Finance Minister Nirmala Sitharaman
Wardha: पोहोचण्याआधीच उद्घाटन केल्याने आमदार संतापले! ठेकेदाराला शिविगाळ; मारायलाही धावले

याबाबत अधिक माहिती अशी की, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत घेतली. यामध्ये त्यांनी राज्यांना ५ वर्षांसाठी देणे असलेली संपूर्ण जीएसटी भरपाई किंवा जीएसटी भरपाईची रक्कम जारी केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. या अंतर्गत १६९८२ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

जीएसटी (GST) कौन्सिलच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला असल्याचे निर्मला सितारामन यांनी यावेळी सांगितले. दिल्ली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह अनेक राज्यांच्या जीएसटी भरपाईबाबतही माहिती देण्यात आली.

Finance Minister Nirmala Sitharaman
Jalna Crime: धक्कादायक! बोहल्यावर चढण्याआधीच भावी नवरदेवाने केली वधूची गळा चिरून हत्या

दरम्यान, या परिषदेत काकवी, पेन्सिल शार्पनरवरील जीएसटी कमी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पेन्सिल शार्पनरवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात येत असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी (Nirmla Sitharaman) दिली. त्यामुळे सर्वसामान्यांना पेन्सिल शार्पनर खरेदी करणे स्वस्त होणार आहे.  तर काकवीवरील जीएसटी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गुऱ्हाळ मालक आणि उत्पादकांना त्याचा फायदा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com