Fact Check: काय सांगता, सरकार देतंय स्कुटी फ्री? व्हायरल मेसेजमागचं सत्य एकदा वाचाच!

Fact Check Viral Message: या योजनेअंतर्गत संपूर्ण भारतातील स्त्री-पुरुषांना मोफत स्कूटी दिली जाईल, असा दावा करण्यात आला आहे. चॅनेलचे १२ हजार सबस्क्राइबर असल्याचेही सांगितले गेले.
Viral Message
Viral Messagesaam tv
Published On

महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहेत. यातील महत्त्वाची योजना म्हणजे मोफत स्कूटी योजना. ही योजना विशेषतः मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या वाहतुकीच्या अडचणी सोडवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे त्या अधिक स्वावलंबी बनू शकतील.

ग्रामीण व शहरी भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, जसे की वाहतुकीच्या सुविधांचा अभाव व सुरक्षिततेची चिंता. या समस्या सोडवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मोफत स्कूटी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना मोफत स्कूटी दिली जाईल, ज्यामुळे त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल.

Viral Message
Vinay Hiremath: गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप, कंपनी ८४००००००००० रुपयांना विकली

"आधारकार्डधारकांना मोफत स्कूटी" असे सांगत एक युट्यूब चॅनेल ‘NaukariNefa-fn3bo’ वरून फ्री स्कूटी योजना 2025 ची जाहिरात केली जात आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण भारतातील स्त्री-पुरुषांना मोफत स्कूटी दिली जाईल, असा दावा करण्यात आला आहे. चॅनेलचे १२ हजार सबस्क्राइबर असल्याचेही सांगितले गेले. मात्र, केंद्र सरकारने या दाव्याला चुकीचे ठरवत स्पष्ट केले आहे की, अशी कोणतीही योजना अस्तित्वात नाही. अशा चुकीच्या माहितीपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Viral Message
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या पैशातून लग्न झालेल्या मुलील्या पहिल्या संक्रांतीला द्या 'हे' गिफ्ट्स

केंद्र सरकार मोफत स्कूटी देत असल्याचा आधारकार्डवरील दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने अशा कोणत्याही योजना लागू केलेल्या नाहीत. नागरिकांना फसवणूक टाळण्यासाठी ‘http://myscheme.gov.in’ या अधिकृत वेबसाइटवरच योजनांची माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Viral Message
Viral Video: लसूण सोलण्याची भन्नाट पद्धत; सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल, पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com