Dhanshri Shintre
संक्रांतीच्या निमित्ताने सोन्याचा छोटासा दागिना, चांदीची जोडवी किंवा पैंजण तिच्या नव्या सुरुवातीसाठी शुभ मानले जाते.
सुंदर साडी, नववारी किंवा पारंपरिक पोशाख तिला खास वाटेल.
तिच्या नव्या घरासाठी उपयोगी ठरतील असे मिक्सर, ओव्हन किंवा किचनच्या वस्तू दिल्यास ती आनंदी होईल.
संक्रांतीच्या खास पारंपरिक अंदाजात पैठणीसारखे भेटवस्त्र योग्य ठरेल.
योजनेच्या काही भागातून तिला तिच्या आवडीनुसार काही खरेदी करण्यासाठी रोख रक्कम देऊ शकता.
तिळगूळ, लाडू, चिक्की यांचे आकर्षक पॅक संक्रांतीच्या निमित्ताने भेट द्या.
तिच्या लग्नाच्या क्षणांचे फोटो फ्रेम करून देणे किंवा एक चांगले स्मरणिकेचे गिफ्ट दिल्यास तिच्या आठवणीत राहील.
NEXT: लाडक्या बहिणींच्या पैशातून मकरसंक्रांतीला कुटुंबासाठी घरच्याघरी बनवा 'हे' गोड पदार्थ