

रोहित कदम, साम टीव्ही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या आवाहनानंतरही सोनेखरेदीकडे ग्राहकांचा ओढा कायम आहे. आता ग्राहकांच्या खरेदीला चाप लावण्यासाठी आणि अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आणखी एक मोठं पाऊल उचललंय.
सोने-चांदीवरील एकूण आयात शुल्क 6 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवलं तर बेसिक कस्टम ड्युटी 10 टक्के तर AIDC उपकर 5 टक्के करण्यात आलाय. कस्टम ड्युटी वाढवल्यानं सोने-चांदीच्या दरात एका रात्रीत वाढ झाली...
केवळ एका दिवसात सोनं 12 हजार 700 रुपयांनी तर चांदी 30 हजारांनी वाढली. सोन्याचा दर प्रतितोळा 1 लाख 51 हजार रुपयांवरून 1 लाख 63 हजार 700 रुपयांवर गेला तर चांदी प्रतिकिलो 2 लाख 68 हजार रुपयांवरून 2 लाख 98 हजारांवर गेला. दुसरीकडे, सरकारच्या निर्णयानंतर ग्राहकांच्या सोनेखरेदीला चाप बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविलीये.
खरंतर,2025-26 मध्ये भारताची सोनं आयात 24 वरून 71.98 अब्ज डॉलर्सवर पोहोचलीये. विशेष म्हणजे, भारत 40 टक्के सोनं स्वित्झर्लंडकडून तर 16 टक्के सोनं UAEकडून आयात करतो. दरवर्षी तब्बल 800 ते 900 टन सोनं आय़ातीपायी भारताला आपली परकीय गंगाजळी खर्ची घालावी लागते.
अशावेळी पंतप्रधानांनी देशवासीयांना आवाहन केलं असलं तरी भारतीय ग्राहकांमध्ये सोन्याबद्दलची ओढ काही कमी झालेली दिसत नाहीये. गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून आजही भारतीय ग्राहक सोन्यालाच पसंती देत आहेत. ज्यामुळे मागणीत घट होण्याऐवजी वाढच होताना दिसतेय. अशातच आता केंद्रानं वाढवलेल्या आयात शुल्कानंतर तरी ग्राहक सोनेखरेदी कमी करतील का हाच खरा प्रश्न आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.