जगभरात Gen Z आंदोलनांचा भडका, सत्ताधाऱ्यांंविरोधात नागरिक रस्त्यावर

Global Gen Z Unrest: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात देशभरातील जेन झी रस्त्यावर उतरलीये. तर दुसरीकडे, महागाई आणि बेरोजगारीमुळे युरोपात अक्षरशः अराजकतेसारखी परिस्थिती निर्माण झालीये. सातासुमद्रापार कुठल्या युरोपीय देशांत जेन-झी आक्रमक झालीये?... पाहूयात या रिपोर्टमधून...
Gen Z protests in France and Italy over inflation
Gen Z protests in France and Italy over inflationsaam tv
Published On: 

भारतात सध्या मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात जेन झी रस्त्यावर उतरलेली असताना जगभरातही विविध देशांमध्ये हेच चित्र पाहायला मिळलंय. पश्चिम आशिया आणि आफ्रिका खंडातल्या काही राष्ट्रांमध्ये जेनझींचा उद्रेक झालाय. आता हे लोण युरोपातील राष्ट्रांमध्येही पसरू लागलंय. याला सर्वात महत्त्वाचं कारण ठरलंय ते महागाईचं....इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे जगभरात महागाईचा आगडोंब उसळलाय. यात बेरोजगारीचीही भर पडत चाललीय. त्यामुळे युरोपातल्या देशातही सरकारविरोधात जेनझी रस्त्यावर उतरू लागलीय.

वाढत्या महागाईविरोधात फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जनआंदोलनाला हिंसक वळण लागलंय. फ्रान्समध्ये चकमकी आणि दुकानांच्या लूटमार प्रकरणी आतापर्यंत 1 हजार 800 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलंय. विशेष म्हणजे, या आंदोलनात जेनझी ते वृद्धांपर्यंत अशासुमारे 5 लाख 50 हजार नागरिकांनी सहभाग घेतल्याची माहिती समोर आलीये.

इटलीतील मिलान शहरात युद्ध आणि वाढत्या महागाईविरोधात काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. मुखवटे घातलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगड आणि अन्य वस्तू फेकल्या. त्यानंतर काही दुकानांची लूट केली, तर मालमत्तांना आग लावण्यात आली. हिंसाचारामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील परिसर रिकामा करण्यात आला. पोलिसांनी 50 आंदोलकांना ताब्यात घेतलं.

अल्बेनिया सरकारच्या धोरणाविरोधात राजधानी तिराना आणि किनारपट्टीवरील दुर्रेस शहरात हिंसक निदर्शने झाली.

बेल्जियममधल्या राजधानी ब्रुसेल्स आणि लीज येथे हिंसक निदर्शने झाली. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात असूनही आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत.

पोर्तुगालच्या लिस्बन, पोर्तो आणि कोइंब्रा येथे आंदोलकांनी मोर्चे आणि रॅली काढल्यात.

स्पेनमध्ये व्यापक विरोध प्रदर्शने झाली. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सरकारनं मुदतपूर्व निवडणुकीची घोषणा केल्याची माहिती आहे.

अर्जेंटिनाच्या ब्युनोस आयर्समध्ये विद्यापीठातील विद्यार्थी आणि कामगार संघटनांनी राष्ट्राध्यक्ष हाविएर मिलेई यांच्या धोरणांविरोधात निदर्शने केली.

काही देशांत सरकारी धोरणे आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवरून सर्वच स्तरातून असंतोष व्यक्त होतोय. वाढता जीवनावश्यक खर्च आणि आर्थिक अडचणींमुळे जगभरातील जेनझींचा रोष वाढत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आगामी काळात महागाई आणि बेरोजगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युरोपीय राष्ट्रांची सरकारं कोणती पावलं उचलतात?... याकडे जगाचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com