uttar pradesh news
uttar pradesh newsSaam Tv

एक तरुणी दोन सख्ख्या भावांच्या प्रेमात; लोकांना आठवला 'गुंडे' चित्रपट

या अनोख्या प्रेमकथेची चर्चा संपूर्ण परिसरात जोरात सुरू आहे.
Published on

Viral News : उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक प्रेमकहाणी (Love Story) समोर आली आहे. ही कथा वाचल्यानंतर तुम्हाला अभिनेता रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर स्टारर बॉलिवूड चित्रपट 'गुंडे' या चित्रपटाची आठवण नक्की येणार. 25 वर्षांची मुलगी दोन सख्ख्या भावांच्या प्रेमात पडली. त्यानंतर तिघेही घर सोडून पळून गेले. (Uttar Pradesh Latest News)

हे संपूर्ण प्रकरण बरेलीच्या शेरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलं आहे. या अनोख्या प्रेमकथेची चर्चा संपूर्ण परिसरात जोरात सुरू आहे.  मुलीचे दोन्ही भावांवर जीवापेक्षा जास्त प्रेम होते, असे स्थानिक लोक दबक्या भाषेत बोलत आहेत. घरातील वडीलधाऱ्यांना याची माहिती मिळताच घरात एकच गोंधळ सुरू झाला. 

uttar pradesh news
Accident : ट्रक-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; १० प्रवाशी जखमी

बेपत्ता तरुणीची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले. तपासादरम्यान दोन्ही भावांनी मुलीला त्यांच्या मामाच्या घरी नेल्याचे पोलिसांना समजले. यानंतर दोन्ही कुटुंबात खळबळ उडाली आहे. त्यानंतर पोलिसांनी तरुणाच्या मामाविरुद्धही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सध्या तिघेही कुठे आहेत, याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. (Tajya News)

मुलीच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांचा शोध सुरू आहे. त्यांचा ठिकठिकाणी शोध घेतला जात आहे. हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी निगडित असल्याने पोलीस अधिकारीही या संपूर्ण प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहेत. दोन्ही कुटुंबाने चुकीचे पाऊल उचलू नये. त्यामुळे पोलीस अधिकारी क्षणोक्षणी माहिती घेत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com