Viral Dance Video: जबरदस्तचं! धावत्या ट्रेनमध्ये तरुणीचा किलर डान्स; तिच्या अदांपुढे गौतमीचाही खेळ खल्लास

Girl Dance In Train: तरुणीच्या धमाकेदार डान्सने ट्रेनमधील प्रवासीही अक्षरशः नाचायला लागल्याचे दिसत आहे....
Viral Dance Video
Viral Dance VideoSaamtv

Girl Dance In Train Viral Video: सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी रस्त्यावर, कधी बसमध्ये तर कधी थेट ट्रेनमध्ये डान्स करतानाचे अनेक व्हिडिओ समोर येत असतात. जे नेटकऱ्यांही भुरळ घालताना दिसतात. सध्या एका तरुणीच्या डान्सचा व्हिडिओही तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती धावत्या ट्रेनमध्ये डान्स करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओने (Viral Video) नेटकऱ्यांना वेड लावले असून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचेही पाय थिरकल्याशिवाय राहणार नाहीत..

Viral Dance Video
Mumbai Fire: जोगेश्वरीत फर्निचर मार्केटला भीषण आग, अनेक गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुणी धावत्या ट्रेनमध्ये जबरदस्त डान्स करत आहे. पुष्पा (Pushpa Movie) या चित्रपटातील सामी – सामी गाण्यावर तिने धमाकेदार डान्स केला आहे. तिच्या या भन्नाट डान्सवर नेटकरीही फिदा झाले आहे. तिच्या दिलखेचक अदा आणि डान्स स्टेप्स पाहून नेटकऱ्यांनी तिची प्रशंसा केली आहे. तर पाठीमागे बसलेले प्रवासी देखील तिच्या डान्सचा आनंद घेत आहेत. प्रवाशांनाही या बिनधास्त तरुणीच्या बोल्ड डान्सचा व्हिडीओ काढण्याचा मोह आवरला नाही.

Viral Dance Video
Onion Price News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

काजल शहा असे या डान्स करणाऱ्या तरुणीचे नाव असून ती एक उत्तम नृत्यांगणा आहे. तसेच तिने अनेक डान्सिंग स्पर्धांमध्येही भाग घेतला आहे. तरुणीने ट्रेनमधील तिच्या या डान्सचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने ट्रेनमध्ये सामी सामी असा कॅप्शनही तिने दिला आहे.

तिच्या अकाउंटवर इतरही अनेक डान्सचे व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये तिच्या धमाकेदार डान्सची झलक पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला ५ लाखांहून अधिक व्हूज मिळाले आहेत तर २ लाख ५७ हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. कमेंट सेक्शनमध्येही यूजर्सकडून तिच्या डान्सची प्रशंसा केली जात आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com